mumbai corporation put restrictions on ganesh festival | Sarkarnama

गणेशोत्सवासाठी मुंबईत नियमावली; नियम पाळले नाहीत तर तुरूंगवारी

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 24 जुलै 2020

महापालिका आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर साथ नियंत्रण कायदा व आपत्ती निवारण कायद्यानुसार कारवाई होईल.

मुंबई : कोव्हिडच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत घरगुती गणेशमूर्ती दोन फुटांपर्यंत आणि शक्‍यतो शाडूची असावी, घरीच किंवा कृत्रिम तलावात विसर्जन करावे, शक्‍यतो विसर्जन माघ महिन्यात किंवा पुढल्या वर्षी करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

घर प्रतिबंधित वस्ती किंवा सील इमारतीत असल्यास त्याबातचे नियम पाळावे. महापालिका आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर साथ नियंत्रण कायदा व आपत्ती निवारण कायद्यानुसार कारवाई होईल, असा इशाराही पालिका प्रशासनाने दिला आहे. या कायद्यानुसार 1 वर्षापर्यंतची कैद आणि दंड अशी शिक्षा होऊ शकते.

सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणे घरगुती गणेशोत्सवासाठीही महापालिकेने नियमावली तयार केली आहे. मुंबईत दीड लाखाहून अधिक घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना होते. सार्वजनिक गणपती आगमन आणि विसर्जनाप्रमाणेच घरगुती गणपतीसाठी पाच माणसांची अट ठेवण्यात आली आहे. तसेच, प्रत्येक ठिकाणी सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक असून मास्क फेसशिल्डचाही वापर करावा, अशी सूचना पालिकेने केली आहे. दर्शनाला येणाऱ्या नागरिकांसाठी मास्क आणि सॅनिटायझरची सोय करणे बंधनकारक आहे.

असे करता येईल

शाडूच्या मूर्तीऐवजी घरातील संगमरवरी अथवा धातूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. शक्‍य असल्यास माघ महिन्यात किंवा पुढील वर्षी विसर्जन करावे. त्यासाठी मूर्तीचे पावित्र्य जपण्यास घरीच मूर्ती पवित्र कपड्यात गुंडाळून ठेवी, असे आवाहन पालिकेने केले आहे.

हे लक्षात ठेवा

  •  आगमन आणि विसर्जनासाठी 5 पेक्षा जास्त माणसांना परवानगी नाही.
  •  शाडूची मूर्ती असल्यास घरीच विसर्जन शक्‍य.
  •  घरी विसर्जन करणे शक्‍य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करावे
  •  नैसर्गिक विसर्जन तळावर जाणे टाळावे
  •  संपूर्ण चाळीतील, इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्ती विसर्जनाची मिरवणूक एकत्र काढू नये.
  •  विसर्जनाची आरती घरीच करावी
  •  लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाऊ नये

कोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार उजेडात

उल्हासनगर :  कोरोना साथीच्या आजारामुळं घाबरलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या मनःस्थितीचा फायदा घेत कोविडवरील इंजेक्शनचा काळा बाजार जोरात सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) उल्हासनगरमधील मनीष नगरमध्ये अशाच प्रकरणात एका महिलेला अटक केली आहे. 

नीता पंजवानी असं अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव असून ती अक्तेमरा (Actemra) हे इंजेक्शन काळ्या बाजारात विकत होती. सुमारे ४०,५४५ रुपयाचे हे इंजेक्शन ती ६० हजार रुपयांना विकत असताना एफडीएच्या आणि पोलीस अधिकाऱ्यांनी सापळा रचुन तिला रंगेहाथ पकडले.या प्रकरणी उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उल्हासनगर पुढील तपासकरीत आहे.

Edited by swarup jankar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख