मोठी कारवाई ; ATSने एकाला ताब्यात घेतलं,  जान मोहम्मदचा हँडलर असण्याची शक्यता

त्याच्यावर मुंबईत घातपात घडवून आणण्याची जबाबदारी सोपवण्यात येणार होती, अशी माहिती मिळत आहे.
Sarkarnama - 2021-09-18T091617.810.jpg
Sarkarnama - 2021-09-18T091617.810.jpg

मुंबई : मुंबई (ATS)च्या टीम नागपाड़ा ने एक संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे. एटीएस आणि क्राईम ब्रांचकडून सध्या याप्रकरणाचा तपास सुरू आहे. काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाही नंतर मुंबई च्या टीम ने त्यातील ७ व्या संशयित आरोपी ला ताब्यात घेतलं आहे. महाराष्ट्र एटीएस आणि गुन्हे शाखेने केलेल्या एकत्रित कारवाईत त्याला एकाला ताब्यात घेण्यात आलं.  

जाकीर असं त्याचे नाव असल्याचे समजते. जाकीर हा अंडरवर्ल्डशी संबंधित असून, तो जान मोहम्मद  (Jan Mohammad Shaikh) याचा हँडलर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  जाकीरने जान मोहमदला मुंबईत हत्यार आणण्यासाठी सांगितलं, असा पोलिसांना संशय आहे. यासाठी जाकीर हा जान मोहमद याच्या संपर्कात होता. त्याचे कनेक्शन दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या अतिरेक्यांसोबत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
 
शनिवारी पहाटे तीन वाजता त्याला ताब्यात घेतलं आहे या कारवाईवेळी एटीएसचे अधिकारी हजर होते. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीला कुठे नेण्यात आलं याबद्दलची माहिती कळू शकली नाही. एटीएसच्या माहितीनुसार, जान मोहम्मद शेख एटीएसच्या रडारवर होता.  20 वर्षांपूर्वी जान मोहम्मदवर मुंबईच्या पायधुनी पोलिस ठाण्यात गोळीबार, तोडफोड, चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहिती समोर आली आहे. 

जानला मुंबईत अनेक वर्ष टॅक्सी चालवण्याचा त्याला अनुभव आहे. त्यामुळे त्याला मुंबईच्या रस्त्यांची खडा न् खडा माहिती आहे. त्याच्यावर मुंबईत घातपात घडवून आणण्याची जबाबदारी सोपवण्यात येणार होती, अशी माहिती मिळत आहे. जान मोहम्मद हा 13 सप्टेंबर रोजी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरुन दिल्लीला रवाना झाला होता. जान मोहम्मदचा अनेक वर्षांपूर्वीपासूनच दाऊद गँगसोबत संबंध होता.  

महापालिकेत शिवसेना-भाजपात जुंपली ; ठेकेदारांवरुन खडाजंगी
मुंबई : मुंबईतील (bmc)रस्ते कामांबाबतच्या निविदा प्रक्रियेवरून सत्ताधारी शिवसेना  (shiv sena)आणि भाजप (bjp) यांच्यात चांगलीच जुंपली आहे.  रस्ते दुरुस्तीच्या कामांवर शिवसेना, भाजप पुन्हा आमने सामने आले आहेत.  भाजपकडून या कामांबाबत राजकारण करून मुंबईकरांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरु आहे. या कंत्राटात भाजपचे ठेकेदार आले नाहीत म्हणून त्यांचा आटापिटा सुरु आहे, असा आरोप शिवसेनेने केला आहे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com