MPSC Exam : सत्ताधारी आमदारही उतरले सरकारविरोधात मैदानात...

पुण्यातील नवी पेठेत शेकडो विद्यार्थ्यांनी रस्ता रोको करून या निर्णयाचा जोरदार विरोध केला.
MPSC Examination postponed MLA Rohit Pawar praniti shinde oppose decision
MPSC Examination postponed MLA Rohit Pawar praniti shinde oppose decision

पुणे : कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे कारण देत १४ मार्च रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने परीक्षार्थी आक्रमक झाले आहे. पुण्यातील नवी पेठेत शेकडो विद्यार्थ्यांनी रस्ता रोको करून या निर्णयाचा जोरदार विरोध केला. तर राज्यात ठिकठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. भाजपनेही हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. सत्ताधारी पक्षातील आमदारही परीक्षार्थींच्या बाजूने उभे राहिले आहेत. त्यामुळे सरकारवरील दबाव वाढू लागला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १४ मार्च रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थी विद्यार्थी चांगलेच संतापले आहेत. कोरोनामुळे ही परीक्षा आतापर्यंत तब्बल सहावेळा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे सर्वाधिक विद्यार्थी पुण्यात आहेत. राज्यभरातून हे विद्यार्थी पुण्यात येतात. त्यामुळे या निर्णयानंतर विरोधाचा पहिला भडका पुण्यात उडाला. त्यानंतर निषेधाचे लोण संपूर्ण राज्यभर पसरले आहे. 

सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदार व नेतेही आता विद्यार्थ्यांच्या बाजून उभे राहिले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना साकडे घातले आहे. कोविडच्या नियमांचे पालन करून ही परीक्षा घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी यातून मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. 

आमदार रोहित पवार यांनीही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना परीक्षेच्या मुद्यावर लक्ष घालण्याची विनंती केली आहे. यापुढे कोरोनामुळे कोणतीही गोष्ट न थांबवता कोरोना प्रतिबंधक नियम पाळून पुढे जावे लागेल. त्यानुसार ही परीक्षा झाली पाहिजे, असे ट्विट पवार यांनी केले आहे.

काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. परीक्षा सातत्याने पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचा निषेध केला आहे. कोरोनाचा संकट कितीही मोठे असले तरीही अशा पध्दतीने अचानकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com