राज्याला अस्थिर करण्याचे षडयंत्र! संजय राऊत विरोधकांवर भडकले

एमपीएससीची परीक्षा पुढे ढकल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी राज्यभर आंदोलन केले. या आंदोलनांमध्ये काही ठिकाणी भाजपचे नेतेही सहभागी झाले होते.
MPSC Exam Sanjay Raut criticise opposition paties over students agitation
MPSC Exam Sanjay Raut criticise opposition paties over students agitation

मुंबई : एमपीएससीची परीक्षा पुढे ढकल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी राज्यभर आंदोलन केले. या आंदोलनांमध्ये काही ठिकाणी भाजपचे नेतेही सहभागी झाले होते. तसेच भाजपच्या काही नेत्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याचा संबंध मराठा आरक्षणाशी जोडला. त्यावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. राज्य अस्थिर करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काल एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्यभर विद्यार्थी रस्त्यावर उतरले. पुण्यातील नवी पेठेत हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले. यावेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही आंदोलन करत सरकारवर टीका केली. त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. काही नेत्यांनी परीक्षेशी मराठा आरक्षणाचा मुद्दा जोडल्याने वाद निर्माण झाला. त्यानंतर आज आयोगाने ही परीक्षा २१ मार्च रोजी घेणार असल्याचे जाहीर केले.

कालच्या राज्यातील स्थितीवर बोलताना राऊत म्हणाले, विरोधकांकडून महाविकास आघाडीला बदनाम करण्याचे आणि राज्य अस्थिर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सरकारविरोधात तरूणांची माथी भडकवून आगीत तेल ओतणे बंद करा. रोजगाराचा प्रश्न मोदींच्या आर्थिक धोरणामुळे निर्माण झाला आहे. त्यानेच लोकांना रस्त्यावर यावं लागतंय.

विदयार्थी व तरूणांना भडकावून राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न करू नये. हे राज्य अस्थिर करण्याच्या षडयंत्रासाठी निरपराध तरुणांचे खांदे वापरू नका. तुमचेच खांदे वापरा. तरुणांच्या खांद्यावर ठेवलेल्या बंदुका तुमच्यावरच उलटतील, अशी टीका राऊत यांनी केली.

ममतादीदी बंगालची वाघीण

ममता बॅनर्जी यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याविषयी बोलताना राऊत म्हणाले, ममतादीदींना जखम झाली असली तरी त्या बंगालच्या वाघीण आहे. भाजपलाच घायाळ करतील. हल्ल्याचे आम्हालाही दु:ख झाले आहे. या हल्ल्याचा ममतादीदींना फायदा होईल. बंगालमध्ये त्यांचेच सरकार बनेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. 

जय श्री राम निवडणुकीचा मुद्दा होऊ नये

पश्चिम बंगालमध्ये जय श्री राम हा निवडणुकीचा मुद्दा बनू लागला आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर जय श्री रामचे नारे दिले होते. यावरून ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यातचही वाद निर्माण झाला. यावर बोलताना राऊत म्हणाले, जय श्री राम हा निवडणुकीचा मुद्दा होऊ शकत नाही. मी बंगालमध्ये गेलो तर जय श्री रामचा नारा देईल. ममतादीदीही श्रीरामाच्या भक्त आहेत. त्यांच्या बाजून सहानुभूती आहे.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com