मंत्र्यांच्या मुलांना वेगळा न्याय...नितेश राणे यांचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

एमपीएससी परीक्षा रद्द झाल्याने राज्यातील विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावे लागले.
MPSC exam postponed nilesh rane criticise CM Uddhav Thakarey
MPSC exam postponed nilesh rane criticise CM Uddhav Thakarey

सिंधुदुर्ग : एमपीएससी परीक्षा रद्द झाल्याने राज्यातील विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावे लागले. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून मंत्र्यांच्या मुलांसाठी, नातेवाईकांसाठी वेगळा न्याय दिला जात आहे. मुलांच्या मतदारसंघांमध्ये असलेले पब, बार किंवा पार्टीला कोणताच नियम लागू होत नाही, असे म्हणत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १४ मार्च रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. ही परीक्षा आता २१ मार्च रोजी होणार आहे. पण राज्य शासनाच्या या निर्णयावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. आमदार नितेश राणे यांनी ही परीक्षा १४ मार्चलाच घ्यावी, अशी भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, सर्वसामान्य लोकांना कायदे लावले जातात. धार्मिक सण, एमपीएससी परीक्षा अशावेळी सरकारला नियम कोरोनाचे नियम आठवतात. महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून असा दुजाभाव केला जात आहे. 

सामान्य घरातील मुलं वर्षभर अभ्यास करून परीक्षा देतात. पण कोणतीही कल्पना न देता दोन दिवसांवर आलेली परीक्षा अचानक पुढे ढकलली जाते. १४ तारखेला परीक्षा घ्यायचीच नव्हती तरी हॉल तिकीट का दिली? मुले परीक्षा केंद्रापर्यंत येण्यासाठी पैसे खर्च करतात. त्याची नुकसानभरपाई कोण देणार? मुलांच्या आयुष्याचा खेळखंडोबा केला जात आहे. मुलांच्या भविष्याशी असाच खेळ सुरू राहिला तर महाराष्ट्राचे भवितव्य अंधारात जायला वेळ लागणार नाही, अशी टीका राणे यांनी केली. 

परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी पूर्ण तयारी केली आहे. हॉल तिकीट मिळाले आहे. मुख्यमंत्र्यांना आठ दिवसांनी परीक्षा घेऊ हे सांगणे सोपे आहे. पण एका कुटूंबामध्ये एक विद्यार्थी जेव्हा परीक्षेची तयारी कशी करतो, याची जाणीव मुख्यमंत्र्यांना नाही. तीन पक्षांतीमधील मतभेद यासाठी कारणीभूत आहेत. भ्रष्टाचारामध्ये मात्र यांचे एकमत होते. सामान्यांसाठी निर्णय घेतानाच वाद निर्माण होतात. ही धूळफेक आहे. ते कदापि खपवून घेणार नाही, असा इशारा राणे यांनी दिला.

सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार म्हणतात, अधिकारीच आपलं ऐकत नाहीत. मग टेंडर काढताना फायली सरकवताना तेव्हा अधिकारी तुमचं कसे ऐकतात? मग एमपीएससीचे अधिकारी तुमचा ऐकत नाहीत? भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करणे म्हणजे लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्यांना महाराष्ट्रद्रोही ठरवले जात आहे. त्यांचा आवाज दाबण्याची गरजच काय? अधिकाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही?, असा सवाल राणे यांनी उपस्थित केला. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com