Sanjay Raut.jpg
Sanjay Raut.jpg

जन आशीर्वाद यात्रेमुळे तिसऱ्या लाटेला निमंत्रण!

राज्याला अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे. ठिक आहे, काही अडचण नाही. तुम्ही किमान संयम पाळा.

मुंबई : भाजपच्या जन आशीवार्द यात्रेवर jan ashirwad yatra शिवसेनेचे खासदार संजय राऊत mp sanjay raut यांनी निशाणा साधला आहे.  जन आशीर्वाद यात्रेमुळे तिसऱ्या लाटेला निमंत्रण देण्याचे काम होणार आहे. जन आशीर्वाद यात्रेची काही गरज नसताना यात्रा काढली जाते आहे. यामुळे राज्यात कोरोनाचं संकट वाढणार आहे, असे राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

संजय राऊत म्हणाले, ''सर्वांना माहित आहे. सध्या ज्या प्रकारच्या गर्दीचं तुम्ही नियोजन करत आहात, शक्ती प्रदर्शने करत आहात. ते म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रणच आहे. ते मुद्दाम करत आहेत. राज्याला अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे. ठिक आहे, काही अडचण नाही. तुम्ही किमान संयम पाळा.''

नुकत्याच केलेल्या एका पाहणीत देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्र्यांच्या यादीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश झाला आहे. उद्धव ठाकरे टॉप फाईव्हमध्ये आले आहेत. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री टॉप फाईव्हमध्ये आले आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, ममता बॅनर्जी, नवीन पटनायक सुद्धा या यादीत आहेत. उद्धव ठाकरेही आहेत. पण भाजपचा एकही लोकप्रिय मुख्यमंत्री या टॉप फाईव्हमध्ये नाहीये, याचं आश्चर्य वाटतं. खरं तर त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. ज्या प्रकारे देशात भाजपचा ग्राफ कोसळत आहे. त्याचाही हा एक परिणाम आहे, असा खोचक टीका राऊतांनी यावेळी केली. 

''कोरोना काळामध्ये ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी काम केलं त्याची दखल आणि नोंद जगाने घेतली. या काळात वर्क फ्रॉम होम ही काळाची गरज होती, म्हणून मुख्यमंत्री करून काम करत होते आता त्यांनी कितीही ढोल बडवत द्या त्याचा काहीही उपयोग होणार नाही, '' असे राऊत म्हणाले. 
 
ठाकरे सरकार CBIच्या अधिकाऱ्यांना धमकावतयं..
मुंबई :  माजी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या सीबीआय तपासात राज्य सरकार सीबीआयला CBI सहकार्य करण्यास तयार आहे; मात्र या प्रकरणाशी संबंध नसलेल्या कागदपत्रांची मागणी सीबीआय करीत आहे, असा दावा राज्य सरकारने Uddhav Thackeray मंगळवारी प्रतिज्ञापत्रात केला. सीबीआयने उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. राज्य सरकार तपासात सहकार्य करीत नसून अधिकाऱ्यांना धमकावत आहे, अशी तक्रार यात केली आहे. या आरोपांवर खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार राज्य सरकारच्या वतीने काल प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले.

 Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com