रायगडाकडे कूच करा..संभाजीराजेंचा मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आदेश..

6 जून रोजी किल्ले रायगडावरून संभाजीराजे कोणती नवी घोषणा करणार, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
0Sambhajiraje_20F.jpg
0Sambhajiraje_20F.jpg

मुंबई : मराठा आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आरक्षणाच रद्द झाले आहे. त्याबाबत संभाजीराजे यांनी राज्यातील अनेक नेत्यांशी भेट घेत सर्वसहमती घडविण्याचा प्रयत्न केला. यात पुढे काय करता येईल, यासाठीचे काही मुद्दे त्यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत मांडले. राज्यभिषेक दिनाला आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करणार असल्याचे सांगितले.  MP Sambhajiraje asks supporters to gather at raigad fort for shivrajyabhishek sohala 

या आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी संभाजीराजेंनी काल मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी ऑनलाईन बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर येण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता ता 6 जून रोजी किल्ले रायगडावरून संभाजीराजे कोणती नवी घोषणा करणार, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.  

खासदार संभाजीराजे यांनी आतापर्यंत राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसस वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आदी नेत्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या. त्यावेळी संभाजीराजे यांनी मराठा समाजाच्या पाच प्रमुख मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्या होत्या. 6 जूनपर्यंत राज्य सरकारने या मागण्यांची पूर्तता केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा संभाजीराजे यांनी दिला होता.

संभाजीराजे छत्रपती रायगडवरावर दरवर्षी शिवराज्याभिषेक दिनाचं आयोजन करताना  15 वर्षांपासून ते रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित करीत आहेत.  गेल्यावर्षी हा सोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला होता. मात्र, यंदा या सोहळ्याला गर्दी होण्याची शक्यता आहे. 

बहुजन समाजाची इच्छा असेल तर नवीन राजकीय पक्षाचा विचार केला जाईल, असे विधान खासदार संभाजीराजेंनी केलं आहे. त्यामुळं येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन पक्ष येणार, या चर्चेला उधाण आले आहे. संभाजीराजेंनी नवा राजकीय पक्ष काढावा म्हणून आता सोशल मीडियातून चळवळ सुरू झाली आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com