नवनीत राणा यांना मोठा धक्का : उच्च न्यायालयाकडून जात प्रमाणपत्र रद्द 

खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
 Navneet Rana .jpg
Navneet Rana .jpg

नागपूर : अमरावतीच्या लोकसभा मतदार संघाच्या खासदार नवनीत राणा यांना मोठा धक्का बसला आहे. अमरावती हा लोकसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता. मात्र, खासदार नवनीत कौर यांनी लुहाणा समुदायाच्या आरक्षणातून निवडणुकीसाठी अर्ज भरला होता. त्यामुळे त्यांच्या या जात प्रमाणपत्राला शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव आडसूळ यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर न्यायालयाने आज निकाल दिला आहे. (MP Navneet Rana's caste certificate canceled by court)

त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांना दोन लाख रुपये दंड आणि सहा आठवड्यात सर्व प्रमाणपत्रक जमा करण्याचे आदेश दिले आहेत. खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.  

दरम्यान, माजी खासदार आनंदराव आडसूळ आणि सुनील भालेराव यांनी ही याचीका दाखल केली होती. याचिकेमध्ये म्हटले होते की अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव होता. पण नवनीत राणा या लुहाणा जातीच्या आहेत. त्यांच्या वडिलांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द ठरवले आहेत. 

असे असतानाही बनावट दस्तऐवजाच्या आधारावर राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवली. ही मतदारांची फसवणूक असून त्यांची निवड अवैध आहे. त्यांची निवड रद्द ठरवण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती. 

मुंबई उच्च न्यायालयाने राणा याचे जात प्रमाणपत्र रद्द केले. त्यामुळे राणा यांच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास दुध का दुध आणि पाणी का पाणी झाले असल्याचे अडसूळ म्हणाले. राणा यांनी बोगस प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवली होती. घटनेच्या चौकटीत हा फार मोठा गुन्हा असल्याचे आडसूळ म्हणाले. यामुळे राणा यांना तुरुंगावारदेखील घडू शकतो, असेही आडसूळ यांनी सांगितले. आनंदराव आडसूळ यांच्या वतीने अॅड. सी. एम्. कोरडे, अॅड. प्रमोद पाटील व अॅड. सचिन थोरात यांनी बाजू मांडली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com