43Sarkarnama_20Banner_20_289_29_15.jpg
43Sarkarnama_20Banner_20_289_29_15.jpg

धक्कादायक : पाच जिल्ह्यांत ७५ टक्क्यांहून अधिक सक्रिय रुग्ण ; पुणे आघाडीवर

सध्या केरळनंतर सक्रिय रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.

मुंबई : सणांनंतर कोविडच्या Corona रुग्णांमध्ये वाढ नोंदवण्यात आली असल्याचे आतापर्यंतच्या निरीक्षणातून समोर आले आहे. सणांदरम्यान नागरिक गर्दी करतात. नागरिकांनी मास्क घालणे किंवा सामाजिक अंतर राखण्यासारख्या मूलभूत नियमांचे उल्लंघन करीत असल्याचेही आढळले आहे. परिस्थिती अशीच राहिली तर गणेशोत्सवानंतर राज्यात रुग्ण वाढण्यास पुन्हा सुरुवात होईल, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार आजपर्यंत महाराष्ट्रातील ६४,९७,८७७ नागरिक कोविड पाॅझिटिव्ह आले आहेत. राज्यभरातील ५०,४०० सक्रिय कोविड रुग्ण आहेत. १३,०१८ रुग्णांसह पुणे Pune जिल्हा यादीत आघाडीवर आहे. त्यानंतर ठाणे ७,९७९, नगरमध्ये ६,०२७ आणि सातारा ५,६३७ असा क्रम लागतो.

सध्या केरळनंतर सक्रिय रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात ५०,४०० सक्रिय रुग्ण आहेत. त्यांपैकी मुंबई, ठाणे, पुणे, सातारा आणि नगर जिल्ह्यांत सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत ७५.८५ टक्के एवढ्या सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे.  गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्याचा इशारा राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी रविवारी (ता. १२) दिला आहे. ओनमनंतर केरळमधील रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे उदाहरण देत आताच खबरदारी घेतली नाही तर कोरोना बाधित वाढून परिस्थिती बिकट बनू शकेल, असे मत राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे Dr. Pradeep Awate यांनी व्यक्त केले आहे.

आवटे म्हणाले, की राज्य सरकारने राज्यातील सर्व जिल्ह्यांना सल्ला दिला आहे. पाच जिल्ह्यांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. आम्ही त्यांना चाचणी सुविधा वाढवण्यास सांगितले आहे. रुग्णांचे विलगीकरण करण्यात आले आहे आणि त्यांची औषधे सुरू केल्याची खात्री करण्यात आली आहे.

राज्यात काल (रविवारी) ३,६२३ नवीन रुग्णांची नोंद झाली. सप्टेंबरमध्ये आतापर्यंत सरासरी १,६९,०२० दैनंदिन चाचण्या झाल्या. ऑगस्टच्या तुलनेत त्या कमी आहेत. राज्यात गेल्या सात दिवसांत चाचणी सकारात्मकता दर (टीपीआर) २.६७ टक्के होता. मात्र, आरोग्य अधिकारी विशेषतः आठ जिल्ह्यांमध्ये जास्त टीपीआरबद्दल चिंतेत आहेत. पुण्यात ६.३३ टक्के टीपीआर, सांगली (५.५९ टक्के) आणि नगर (५.३९ टक्के) जिल्ह्यात ५ टक्क्यांपेक्षा जास्त टीपीआर आहे. त्यातून स्पष्ट होते की कोविड परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही.
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com