more than sixteen thousand employment opportunities in mumbai | Sarkarnama

मुंबईत 16 हजार रोजगारांच्या संधी उपलब्ध

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 1 जुलै 2020

या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने केले आहे.

मुंबई : मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील कुशल तसेच अकुशल उमेदवारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन दि. 8 जुलै ते 12 जुलै, 2020 दरम्यान करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी जवळपास 16 हजार 726 रोजगारांच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने केले आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, वांद्रे, मुंबई यांचेकडील मुंबई शहर, मुंबई उपनगर तसेच ठाणे येथील विविध पायाभूत प्रकल्पांमध्ये गवंडी, सुतारकाम, फीटर (स्टील फिक्सींग), फीटर (बार बेंडींग), वेल्डर, इलेक्ट्रीशियन, वायरमन अशा कुशल तसेच अकुशल स्वरुपाच्या रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

सदर संधी जिल्ह्यातील नोंदणीकृत उमेदवारांना उपलब्ध होण्याकरीता मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांमार्फत दिनांक  08 जुलै, 2020 ते 12 जुलै, 2020 दरम्यान ऑनलाईन पद्धतीने  ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.  या ऑनलाईन रोजगार मेळाव्यामध्ये नियोक्त्यांकडून उमेदवारांच्या मुलाखती स्काईप, व्हॉट्सएप आदींच्या माध्यमातून व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेण्याचे नियोजन आहे.

सदरच्या ऑनलाईन मेळाव्यामध्ये सहभाग घेण्यासाठी इच्छूक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदविलेल्या रजिस्ट्रेशन क्रमांक व पासवर्ड ने लॉगीन करावे व पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा यावर क्लिक करून मुंबई उपनगर जिल्ह्यातील उमेदवारांनी मुंबई उपनगर जिल्हा निवडून उपलब्ध कंपनीला नोकरीसाठी अर्ज करावा. लवेब पोर्टलवर रोजगार मेळाव्यात सहभाग घेताना काही अडचण उद्भवल्यास मुंबई शहरच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी दूरध्वनी क्र. 22626303 किंवा या ई-मेल umbaicity.employment@gmail.com आणि मुंबई उपनगरच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी दूरध्वनी क्र. 22626440 किंवा या ई-मेल-mumbaisuburbanrojgar@gmail.com वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यातील नवीन एमआयडीसी मंजूर :सुभाष देसाई

मुंबई : आगामी काळात कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक मोठे उद्योग सुरू होणार आहेत, याद्वारे कोकणातील छोट्या-मोठ्या उद्योजकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्याचा त्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले. कोकण उद्योग फोरमच्यावतीने ‘ग्रामीण उद्योगांतील संधी’ या विषयावरील वेबिनारमध्ये श्री. देसाई बोलत होते. मुंबई व परिसरातील सुमारे दोनशे छोटे-मोठे उद्योजक यात
सहभागी झाले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख