Video : मुंबई, कोकणाला झोडपलं; पुढील दोन-तीन दिवसांत अतिवृष्टीचा इशारा

मान्सूनचे महाराष्ट्रात जोरदार आगमन झाले असून त्याचा पहिलाच तडाखा मुंबई व कोकणाला बसला आहे.
Monsoon has arrived in Mumbai today Severe waterlogging
Monsoon has arrived in Mumbai today Severe waterlogging

मुंबई : मान्सूनच्या (Monsoon) सरींनी मुंबईसह कोकणाला रात्रीपासून झोडपून काढलं आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस (Rain) सुरू असून बहुतेक रेल्वेमार्ग, रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. अनेक ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. तर ठाणे ते सीएसटीदरम्यानची मध्य रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली आहे. (Monsoon has arrived in Mumbai today Severe waterlogging)

मान्सूनचे महाराष्ट्रात जोरदार आगमन झाले असून त्याचा पहिलाच तडाखा मुंबई व कोकणाला बसला आहे. पावसाळ्यात मुंबई नेहमीच पाण्याखाली जाते. मुंबई महापालिकेकडून दरवर्षी पावसाळीपूर्व कामं केल्याने यावेळी मुंबई तुंबणार नाही, असा दावा केला जातो. पण यावेळी पहिल्याच पावसात महापालिकेचं पितळ उघडं पडलं आहे. अनेक भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साठलं असून नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. 

कुर्ला, सायन, दादर, मानखूर्द, अंधेरी, जोगेश्वरी, घाटकोपर, चेंबूर, मालाड गोरेगाव, भांडूप, मुलूंड अशा अनेक भांगात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. काही भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याने काही तासांतच रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. सकाळच्या कामाच्या वेळेतच पाऊस आल्याने चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. 

मुंबई, कोकणाला अलर्ट

हवामान विभागाने ता. 11 व 12 जून रोजी मुंबईसह कोकणाला अलर्ट दिला आहे. या दोन दिवस मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच उद्यापासून महाराष्ट्रातील अनेक भागांतर पावसाची शक्यता र्वतवण्यात आली आहे. त्यामुळे ता. 11 व 12 हे दोन दिवस मुंबई व कोकणसाठी धोक्याचे मानले जात आहेत. 

महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मान्सूनचे आज आगमन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बहुतेक ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही भागांत ढगाळ वातावरण असून काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्यास सुरूवात झाली आहे. यावर्षी हवामान खात्याने देशभरात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com