भाजपचं सरकार आहे तिथे कोरोना पळून गेला का..राऊतांचा सवाल - modi govt insult maharashtra bjp leaders should oppose to it otherwise dont have right to do politicsin maharashtra Sanjay Raut | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

इंदापूरला उजनीतून पाणी देण्याचा निर्णय रद्द : जयंत पाटील यांची घोषणा
मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सह्याद्रीवर दाखल. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे हेही उपस्थित आहेत.
मराठा आरक्षणासाठीची भाजपची महत्वाची बैठक आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होत आहे. यासाठी रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, प्रवीण दरेकर उपस्थित आहेत.

भाजपचं सरकार आहे तिथे कोरोना पळून गेला का..राऊतांचा सवाल

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 एप्रिल 2021

विरोधकांना महाराष्ट्रात राजकारण करण्याचा अधिकार नाही.

मुंबई : ''महाराष्ट्र, छत्तीसगढ आणि पंजाब ही राज्ये कोरोना हाताळणीत अपयशी ठरली असे केंद्र सरकारेच म्हणणे आहे. मात्र, हे त्या राज्यांचे नव्हे तर मोदी सरकारचे अपयश आहे.  ज्या ठिकाणी भाजपचे सरकार नाही तेच अपयशी ठरले आणि जिथे भाजपचं सरकार आहे तिथे कोरोना पळून गेला, कारण तेथे भाजपचे सरकार आहे, असं काही नवीन धोरण केंद्राने तयार केले आहे का,'' असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 

संजय राऊत म्हणाले, ''कोरोना संकटातही केंद्र सरकार प्रशासनाला हाताशी धरून भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये राजकारण करत आहे. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. राज्यातील विरोधी पक्षाने याचा सर्वप्रथम विरोध केला पाहिजे. परंतु, त्यांना केंद्र सरकारची ही कृती महाराष्ट्राचा अपमान वाटत नसेल तर विरोधकांना महाराष्ट्रात राजकारण करण्याचा अधिकार नाही.''
 
''मोदी यांच्या नेतृत्वाखाली धोरणाची ही लढाई लढली गेली आहे. मोदी यांच्या प्रत्येक सूचनेचे पालन राज्य सरकार करत आहे. 'प्राण जाये पर वचन न जाये' अशा पद्धतीने महाराष्ट्र सरकारने  कोरोनाविरूद्ध मोहीम राबवली आहे. संपूर्ण देशाचा भर महाराष्ट्रावर आहे स्थलांतरित मजूर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आहेत. गुजरात मधील भाजपच्या कार्यालयामध्ये हवी तेवढी रेमडेसिव्हीर मिळत आहेत. हे राष्ट्र एक आहे पण ते एक ठेवण्याचा प्रयत्न दिसत नाही.,''असे राऊत म्हणाले. 
 
''आंदोलन हा भाजपचा राष्ट्रीय कार्यक्रम असेल तर तो त्यांना करू द्या, एकीकडे महाराष्ट्रामध्ये अपयश असल्याचं केंद्र मंडळ तर दुसरीकडे अशा पद्धतीला भाजपचे नेते वागत असतील तर काय म्हणायचं. भाजपच्या मुख्यालयामध्ये जितके हवे असतील तितके रेमडेसिविर उपलब्ध आहे,'' अशी टीका राऊत यांनी केली आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख