मनसेचे कार्यकर्ते झाले 'पोलीस' लुटले टेम्पो चालकाला!  

पोलीस असल्याची बतावणी करुन टेम्पो चालकाला रस्त्यात अडवून, त्याच्याजवळची रोख रक्कम लुटल्याप्रकरणी मनसेच्या पदाधीकाऱ्यांना अटक
 MNS workers robbed the tempo driver. jpg
MNS workers robbed the tempo driver. jpg

मुंबई : पोलीस असल्याची बतावणी करुन टेम्पो चालकाला रस्त्यात अडवून, त्याच्याजवळची रोख रक्कम लुटल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तीन पदाधिकाऱयांना नवी मुंबईतील वाशी पोलिसांनी अटक केली. तर यातील चौथा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी अटक केलेल्यामध्ये मनसे कामगार सेनेचा सरचिटणीस प्रशांत शिंदे, कोपरखैरणेतील शाखा अध्यक्ष मिथून राजगे आणि हरिश्चंद्र पाष्टे या तिघांचा समावेश आहे. हे तिघे व त्यांचा चौथा साथीदार, यांनी बुधवारी रात्री वाशीतील अरेंजा सर्कल चौकात अब्दुल हालीम चौधरी ह्या टेम्पो चालकास अडवून पोलीस असल्याचे सांगत जबरदस्तीने त्याच्या खिशातून 400 रुपये घेतले. त्याला शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडून फोन पे द्वारे देखील 800 रुपये आपल्या मोबाईलवर ट्रान्सफर करुन घेतले. 

सदर घटनेनंतर टेम्पो चालकाने वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या चौघांवर जबरी चोरी तसेच पोलीस बतावणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी शोध घेत तिघांना कोपरखैरणेतून अटक केलीय. तर या प्रकरणातील चौथा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

हे ही वाचा...

कृष्णा हेगडेंचा भाजपला रामराम करत शिवसेनेत प्रवेश; मनसेला पुन्हा धक्का 
 
मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोपी करणारी महिला रेणू शर्माच्या विरोधात तक्रार देऊन चर्चेत आलेले भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विलेपार्ल्याचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी शुक्रवारी (ता. 5 फेब्रुवारी) रात्री शिवसेनेत प्रवेश केला. तसेच, विलेपार्ले विधानसभेच्या 2019 निवडणुकीतील मनसेच्या उमेदवार जुईली शेंडे ह्यांनीही भगवा हाती घेतला. या दोघांचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले. 

ह्या प्रवेश प्रसंगी राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेना नेते अनिल परब, युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई हेही उपस्थित होते. 

कृष्णा हेगडे कॉंग्रेस पक्षाचे पार्ले विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी शिवसेनेचे विनायक राऊत यांना निवडणुकीत हरवलं होतं. काही वर्षांपूर्वी हेगडे यांनी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण, भाजपकडून त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी आज रात्री भाजपचा त्याग करत शिवसेनेचा भगवा हाती घेतला. कृष्णा हेगडे हे मुंबईचे माजी महापौर रमेश प्रभू यांचे जावई आहेत. 

हेगडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने पार्ल्यातील संघटना बांधणीत मदत होणार असल्याचे म्हटले जात आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनेही शिवसेनेने मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे राजकीय वर्तुळातून सांगण्यात येत आहे. 

दरम्यान, रेणू शर्मा नावाच्या महिलेने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. त्यावेळी कृष्णा हेगडे हे संबंधित महिला आपल्याही ब्लॅकमेल करीत होती, असे म्हणत तिच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दिली होती. त्यामुळे ते चर्चेत आले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com