मुख्यमंत्री साहेब, चक्रीवादळाला लाजवेल असा तुमचा दौरा..मनसेची खोचक टिपण्णी.. - MNS Sandeep Deshpande take a dig at Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

मुख्यमंत्री साहेब, चक्रीवादळाला लाजवेल असा तुमचा दौरा..मनसेची खोचक टिपण्णी..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 22 मे 2021

मुख्यमंत्र्यांच्या  दैाऱ्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे  यांनी टीका केली आहे.  

मुंबई : तैाते Tauktae Cyclone वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणचा दैारा केला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी नुकसान झालेल्या परिसराची पाहणी केली. प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांच्या या दैाऱ्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे Sandeep Deshpande यांनी टीका केली आहे.  MNS Sandeep Deshpande take a dig at Uddhav Thackeray

"मुख्यमंत्री साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे, चक्री वादळाला लाजवेल असा तुमच्या दौऱ्याचा वेग होता. पुराणकाळात देवी देवता वगैरे मनोवेगाने फिरायचे तसे तुम्ही फिरलात. खरच BEST C M," असे टि्वट करुन देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या या दैाऱ्याची खिल्ली उडवली आहे. 

 ..एक रुपयाचीही मदत सरकारने केली नाही..चंद्रकांतदादांची सरकारवर टीका

सिंधुदुर्गमध्ये पोहोचल्यानंतर मालवण मधील वायरी गावातल्या नुकसानीची पाहणी करत असताना मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी संवेदनशील आहेत. ते नक्कीच महाराष्ट्राला मदत करतील. नुकसानीबाबत त्यांना कळविण्यात आले आहे. आम्हाला राजकारण करायचे नाही. चक्रीवादळ भीषण होते. जे काही नुकसान झाले आहे ते केंद्राच्या निकषाप्रमाणे आम्ही मदत देणार आहोतच. राज्य सरकार म्हणून आणखीन जे काही करता येणे शक्य आहे ते केले जाईल. एकूणच दोन्ही नेत्यांच्या दौऱ्यातून कोकणाला काय मिळणार, याकडे मात्र कोकणवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
 
"कोकणाने शिवसेनेला भरपूर दिले आहे. निसर्ग चक्रीवादळ असो वा तौते वादळ, यात लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता शिवसेनेची देण्याची वेळ आली आहे ; मात्र हात आखडता घेऊन केंद्राकडे बोट दाखवले जात आहे. राजकारणात जेवढे प्रेम दाखविले जाते तेवढे आपत्ती काळातही कोकणावर सेनेने प्रेम दाखवावे," अशी कोपरखळी काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मारली.
 
"मी वैफल्यग्रस्त नाही, मी येथे दुःख जाणून घ्यायला आलो आहे. दिलासा देण्यासाठी आलो आहे. फोटोसेशनसाठी नाही," असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

उद्धव ठाकरे यांनी  मालवण व वेंगुर्ला येथील नुकसानग्रस्त नागरिकांशी देखील त्यांनी चर्चा केली. "कोकण आणि माझे नाते अतूट आहे ते कोणीही तोडू शकत नाही," असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.  “मी हेलिकॉप्टरमधून नाही, तर जमिनीवरुन पाहणी करणार,” असाटोलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला. 

"येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होतील आणि पंचनामे पूर्ण झाल्यावर मदतीची घोषणा केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.  मला कोणत्याही परिस्थितीचं राजकारण करायचं नाही, विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी आलेलो नाही," असे ठाकरे म्हणाले.
 
चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या पंचनाम्यामधून सुमारे 10 कोटी रूपयांचे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. किनारी भागातील मच्छिमार बांधव आणि हापूस व काजू बागायतीचे या वादळात मोठे नुकसान झाले आहे. 
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख