मनसे भाजपच्या साथीला..कोरोना ह्रदयसम्राट गप्प का?

मनसे भाजपच्या मदतीला धावून आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहे.
2sd22f.jpg
2sd22f.jpg

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे narayan rane यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakre यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. राज्यातील विविध भागात शिवसैनिकांकडून आंदोलन केले जात आहेत. या वादात आता मनसेचे उडी घेत, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे व मनसेचे एकमेव आमदार असलेले राजू पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. 

संदीप देशपांडे आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की, आज सकाळपासून महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था फाट्यावर मारून आंदोलन आणि गर्दी जमवली जात आहे. कुठेही सोशल डिस्टनसिंग नाही. गर्दीच गर्दी असून कोरोना ह्रदय सम्राट गप्प का?'   

मनसेचे कल्याणचे आमदार राजू पाटील यांनी सुद्धा टि्वटमध्ये म्हटले की, अपमान अपुऱ्या लसीकरणाने होत नाही, अपमान बेरोजगारीने होत नाही, अपमान प्रचंड महागाईने होत नाही, सामान्य माणसाला मानच देत नाही हे लोक तर अपमान कसा होईल ? असा सवाल करत ठाकरे यांच्यावर टिका केली आहे.  यावरून मनसे भाजपच्या मदतीला धावून आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, ''आम्ही राणे यांच्या वक्तव्याच समर्थन करणार नाही. मात्र, राणे यांच्या सोबत पक्ष म्हणून आहोत. सरकारकडून सत्तेचा दुरूपयोग केला जात असून, पोलिसांचा वापर केला जात आहे आणि सरकारला खूश करण्यासाठी पोलीस काम करत आहेत. जेंव्हा केंद्रीय मंत्र्याला निर्लज्ज म्हणता, लाथा मारण्याची भाषा केली जाते. त्यांच्यावर कारवाई का होत नाही. सरकारची ही दुटप्पी भूमिका आहे. लोकशाही मध्ये या गोष्टी योग्य नाहीत.'' 

मुंबईत नारायण राणेंच्या जुहू येथील घरासमोर आंदोलन करणारे युवासेनेचे कार्यक्रते आणि भाजपचे कार्यक्रते एकमेंकांना भिडल्याने पोलिसांनी सैाम्य लाठीमार केला आहे. परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. शिवसेना-भाजप कार्यक्रत्यांमधील राडा झाला असून एकमेंकांवर दगडफेक झाली. ही दगडफेक भाजपने केली असल्याचा आरोप युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी केला आहे.  
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com