'ते' घराबाहेर पडण्यासाठी घाबरतात ; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात

'लॉकडाउन आवडे सरकारला' अशी परिस्थिती सरकारची झाली आहे.
1Sarkarnama_20Banner_20_202021_07_20T153847.413.jpg
1Sarkarnama_20Banner_20_202021_07_20T153847.413.jpg

मुंबई :  'मंदिरे सुरू करा,' अशी मागणी लावून धरत मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी ठाकरे सरकारच्या Uddhav Thackeray विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. ''मंदिर उघडली पाहिजे,'' यासाठी मनसेकडून लवकरच घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. 

''सरकारला जनआशीर्वाद यात्रा, मेळावे चालतात, पण सण आला की लॉकडाऊन करतात, 'लॉकडाउन आवडे सरकारला' अशी परिस्थिती सरकारची झाली आहे. सगळ्यांना नियम सारखे लावा, एकाला एक दुसऱ्याला दुसरा नियम असं चालणार नाही. शिवसेना विरोधात असती तर त्यांनी काय केलं असते. 'ते' घराबाहेर पडण्यासाठी घाबरतात. तर आम्ही काय करणार,'' असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.  

''दहीहंडी साजरी करण्याचे मनसेच्या कार्यक्रर्त्यांना मीच सांगितलं. दहीहंडीवर बंदी घालणे, मंदिरं बंद ठेवणं हे सूडबुद्धीने सुरू आहे. नारायण राणे यांच्या घरासमोर हाणामारी सुरू, मेळावे सुरू, भास्कर जाधव च्या मुलांसाठी मंदिर उघडी आहेत, क्रिकेट, फुटबॉल सगळं सुरू आहे, तुम्ही वाट्टेल त्या गोष्टी करायच्या, आम्ही दहीहंडी साजरी करायची नाही,'' असा संतप्त सवाल ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे.

बाळा नांदगावकर पोलिसांच्या ताब्यात ; राम कदम स्थानबद्ध
मुंबई : दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी भाजप आणि मनसेने हट्टाने हंडी बांधायला सुरुवात केली असली तरी, दहीहंडी सार्वजनिक साजरी करता येणारच नसून नियमात कोणतीही शिथिलता दिली जाणार नसल्याचे गृह विभागान काल पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. दहीहंडी Dahihandi साजरी करणाऱ्या मनसे कार्यक्रर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. भाजपचे आमदार राम कदम Ram Kadam यांनी दहीहंडी उत्सव साजरा करण्याचे नियोजन केले होते. दहीहंडी फोडण्यापूर्वी पोलिस राम कदम यांच्या घरी पोहचले आहेत. पोलिसांनी आपल्याला स्थानबद्ध केले असल्याचे राम कदम यांनी टि्वट करीत म्हटलं आहे. 
 Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com