राज ठाकरे म्हणाले, ''फेरीवाल्याचं काय ते आम्ही बघून घेऊ'' 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कल्पिता पिंपळे यांची भेट घेतली.
Sarkarnama (49).jpg
Sarkarnama (49).jpg

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या ओवळा-माजीवडा प्रभागाच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे Kalpita Pimple यांच्यावर दोन दिवसापूर्वी माजीवडा परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या असताना तिथे आलेल्या अमर्जीत यादव या फेरीवाल्याने त्यांच्यावर अचानक चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांची 2 बोटे आणि त्यांच्या अंगरक्षकाचे 1 बोट तुटले. त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपीटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कल्पिता पिंपळे यांची भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मनसे नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई,  शिरीष सावंत व जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव आदी उपस्थित होते. यावेळी पिंपळे यांना ठाकरे म्हणाले, ''तुम्ही काळजी घ्या, फेरीवाल्याचं काय ते आम्ही बघून घेऊ.'' ''जे काय घडलं त्याचं दु:ख आहेच, पण काळ सोकावतोय. अशाप्रकारची हिम्मत ठेचणं गरजेचं आहे. पोलीस त्यांचं काम करत आहेत, न्यायालयही योग्य न्याय देईल अशी अपेक्षा आहे. पोलिसांनी त्यांची कारवाई केली, त्याला कठोर शिक्षा होईल असं वाटतंय,'' असं राज ठाकरे म्हणाले.

सरकारनं वेळेत मानधन न दिल्याने वसतिगृह अधीक्षकांची आत्महत्या
काल राज ठाकरे यांनी हल्लेखोरांना इशारा दिला होता. ते म्हणाले की, 'अनाधिकृत फेरीवाल्यांची मस्ती उतरवली पाहिजे. एका महिला अधिकाऱ्याची बोटं छाटली जातात, याचा नुसता निषेध करुन चालणार नाही. इतक्या वर्षात कुणाची हिंमत झाली नाही बोटं छाटायची. सरकारी अधिकाऱ्याची बोटं छाटण्याची हिंमत कशी होते ? ज्यादिवशी हल्लेखोर पोलिसांच्या तावडीतून सुटणार तेव्हा त्यांना मनसे चोपणार,''

'मंदिरे सुरू करा,' अशी मागणी लावून धरत मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी ठाकरे सरकारच्या Uddhav Thackeray विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. ''मंदिर उघडली पाहिजे,'' यासाठी मनसेकडून लवकरच घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा राज ठाकरे यांनी काल दिला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com