मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी संवाद साधणार..  - MNS president Raj Thackeray will interact with Chief Minister Thackeray  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी संवाद साधणार.. 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 20 मे 2021

मराठी मनोरंजन क्षेत्रासमोर सध्या काय अडचणी आहेत, याचा आढावा   राज ठाकरे यांनी घेतला.

मुंबई : सर्वच क्षेत्रासमोर कोरोनाच्या संकटात अडचणी निर्माण झाल्या आहेत. याला मनोरंजन क्षेत्रही अपवाद नाही. मराठी मनोरंजन क्षेत्रासमोर सध्या काय अडचणी निर्माण झाल्या आहेत याचा आढावा आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी घेतला. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने या ‘झूम’ संवादाचं आयोजन केलं होतं. MNS president Raj Thackeray will interact with Chief Minister Thackeray

'झूम'च्या माध्यमातून राज ठाकरे यांनी नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी, संगीत, टीव्ही मालिका या क्षेत्रात कार्यरत असलेल्या पन्नासहून अधिक मान्यवरांशी संवाद साधला.  त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.  

राज्यात चित्रीकरणाला परवानगी मिळावी, राज्यभरातील लोककलावंतांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावं, वाद्यवृंद कलावंत आणि बॅकस्टेज कामगारांना अनुदान देण्यात यावं आणि त्यांच्या लसीकरणासाठी विशेष व्यवस्था करण्यात यावी, अशा विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. 

जयश्री पाटलांनी अनिल देशमुखप्रकरणी ED दिले अनेक पुरावे..   

एकपडदा चित्रपटगृहांची अवस्था, सध्या तयार असलेल्या चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी काय करता येईल या उपाययोजनांवरही चर्चा झाली. दीड तास चाललेल्या या ‘झूम’ संवादात सर्व समस्या आणि मागण्या राज ठाकरे यांनी नोंदवून घेतल्या.  यातील तातडीच्या मागण्यांविषयी आपण मुख्यमंत्र्यांशी लगेच संपर्क साधून पाठपुरावा करु, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. दोन दिवसात याविषयांवर कार्यवाही होऊ शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  गरज भासल्यास असाच ‘झूम’ संवाद मुख्यमंत्र्यांसोबत करण्याबाबत त्यांनी तयारी दर्शवली.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख