मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल - MNS president Raj Thackeray admitted to Lilavati hospital | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 10 एप्रिल 2021

राज ठाकरे यांना त्या बैठकीला उपस्थित राहता आलेले नाही.

मुंबई  ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना शनिवारी (ता. १० एप्रिल) लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्या कंबरेचा स्नायू दुखावला असून त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. पण, कंबरेच्या स्नायूच्या दुखापतीमुळे राज ठाकरे यांना त्या बैठकीला उपस्थित राहता आलेले नाही. त्यांच्या स्नायूची दुखापत बळावल्याने त्यांना आज तातडीने रुग्णालयात दाखल व्हावे लागले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची लीलावती रुग्णालयात एमआरआय चाचणी करण्यात आली होती. त्याच दुखावलेल्या स्नायूवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना उद्याच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यात लावण्यात येणाऱ्या लॉकडाऊनसंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला राज हे उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र, कंबरेच्या स्नायूच्या दुखापतीमुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल व्हावे लागल्याने ते आजच्या सर्वपक्षीय बैठक उपस्थित राहू शकले नाहीत.  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये राज ठाकरे यांच्याशी कंबरेच्या स्नायूच्या दुखापतीसंदर्भात चर्चा केली होती, अशी माहिती आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख