महावसुली सरकार सामान्य जनतेच्या विचार कधी करणार? मनसेचा हल्लाबोल

संदीप देशपांडे यांनी एका युवकाचा व्हिडिओ शेअर करीत सरकारला टोला लगावला आहे.
2sd22f.jpg
2sd22f.jpg

मुंबई  : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. यात लोकल सेवा बंद असल्याने सामान्या प्रवाशांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एका युवकाचा व्हिडिओ शेअर करीत सरकारला टोला लगावला आहे. mns leader sandeep deshpande slams thackeray government over mumbai 

राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. यात डेल्टा प्लस हेरिंयटचे आवाहन सरकारसमोर उभे ठाकले आहे. तर निर्बंध अधिक कडक केले आहे. मुंबईतील लोकल प्रवास अद्यापही सर्वसामान्यांनासाठी बंदच आहे. अशा परिस्थितीला वैतागलेल्या एका तरूणाने रेल्वे प्रशासनावर ताशेरे ओढत ठाकरे सरकारविषयी नाराजी व्यक्त केली आहे. या युवकाने त्यांचा व्हिडिओ टि्वटवर शेअर केला आहे, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी हा व्हिडिओ रिटि्वट केला आहे. ''बहिरं सरकार ऐकेल का,'' असा सवाल देशपांडे यांनी राज्य सरकारला विचारला आहे. 

लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंद असली तरी या युवकाने प्रवास केला. त्याला टीसीने परेल स्थानकावर पकडले. त्यानंतर या युवकाने त्रस्त होऊन हा व्हिडिओ शेअर करीत लोकल बंदीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ''नोकरीचा आज माझा दुसरा दिवस आहे. परेल स्थानकावर आल्यावर मला टीसीने पकडले. यात त्यांची काही चूक नाही. पण सरकारला कधी जाग येणार..सामान्य माणस रोज कमावतात अन् खातात. त्यांनी जायचं कुठं आज माझ्या खातात चारशे रूपये आहे, असे त्याने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. 

एका दुसऱ्या टि्वटमध्ये संदीप देशपांडे म्हणतात, की तुमची घरं वसुली वर चालतात पण सामान्य जनतेला नौकरी उद्योग धंदे करून घर चालवाव  लागत. महावसुली सरकार सामान्य जनतेच्या विचार कधी करणार??

जयंत पाटील, मुंडेंची राष्ट्रवादी परिसंवाद यात्रा नांदेडमधूनच मागे फिरणार..
नांदेड : राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांना संवाद साधण्यासाठी काढण्यात आलेली  राष्ट्रवादी परिसंवाद यात्रा सध्या नांदेड जिल्ह्यात पोहचलेली आहे मात्र, डेल्टा प्लस व्हाइरसच्या वाढत्या प्रभावामुळे अखेर राष्ट्रवादी परिसंवाद यात्रा रद्द करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष जयंत पाटील यांचे स्वीय सहाय्यकांनी दिली.   
 Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com