रुग्णसंख्या वाढली की जनता बेजबाबदार अन् कमी झाली की…

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर राज्य सरकारने लॉकडाउनकरण्याचा निर्णय घेतला होता.
 Uddhav Thackeray .jpg
Uddhav Thackeray .jpg

मुंबई : राज्यातील रुग्णसंख्येचा आलेख खाली घसरताना दिसत आहे. राज्यात सोमवारी आढळून आलेल्या नवीन रुग्णंसख्येपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या दुप्पट होती. त्यामुळे दिलासादायक चित्र आहे. मात्र, कोरोनाच्या यश-अपयशावरून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण (MNS) सेनेने राज्य सरकारला सवाल केला आहे. (MNS leader Sandeep Deshpande criticizes the state government)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर राज्य सरकारने लॉकडाउनकरण्याचा निर्णय घेतला होता. लॉकडाउनचे परिणाम आता दिसून येत असून, रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. मुंबईतील परिस्थितीही नियंत्रणात येत आहे. मुंबई मॉडेलचे कौतुक होत आहे. मुंबई आणि राज्यातील कोरोना परिस्थितीवर समाधान व्यक्त करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी सवाल उपस्थित केला आहे.

संदीप देशपांडे यांनी त्या संदर्भात ट्वीट केले आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, ''आज महाराष्ट्रातील रुग्ण संख्या कमी होते आहे. चांगली गोष्ट आहे त्याच श्रेय मुंबई मॉडेल, मुख्यमंत्री, पालकमंत्री सगळेच घेत आहेत. म्हणजे रुग्ण संख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकार आणि प्रशासनाच यश, अशी दुटप्पी भूमिका सरकार आणि प्रसार माध्यमे कशी घेऊ शकतात?,'' असे देशपांडे यांनी म्हटले आहे.  

राज्यात सोमवारी १० मे रोजी दिवसभरात रुग्णसंख्येत मोठी घट झाली. दिवसभारात ३७ हजार ३२६ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे ही गेल्या काही आठवड्यांतील सर्वात निच्चांकी रुग्णसंख्या ठरली. विशेष म्हणजे सोमवारी ६१ हजार ६०७ रुग्ण जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी होऊन रिकव्हरी रेट ८७ टक्क्यांच्या जवळ पोहोचला. राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या २ कोटी ९६ लाख ३१ हजार १२७ चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यातील ५१ लाख ३८ हजार ९७३ चाचण्यांचे अहवाल आता पर्यंत पॉझिटिव्ह आले आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com