सावधान: नवीन स्ट्रेन..विधिमंडळ अधिवेशन कोरोना...मनसेचा टोला - MNS leader Sandeep Deshpande criticizes the government | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

सावधान: नवीन स्ट्रेन..विधिमंडळ अधिवेशन कोरोना...मनसेचा टोला

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

विधिमंडळ अधिवेशन होणार की नाही, यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.  

मुंबई : राज्य सरकारमधील मंत्र्यांनाच कोरोनाचा संसर्ग होऊ लागला आहे. कोरोनामुळे सर्वच राजकीय पक्षांची चिंता वाढली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राजकीय पक्षांना कार्यक्रम रद्द करण्याचे आवाहन केले आहे. मंत्र्यांनाच कोरोनाची लागण होत असल्याने विधिमंडळ अधिवेशन होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.  

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्यासह राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाही दुसऱ्यांदा
कोरोना झाल्याचे समोर आले आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मुंबईतील घरातील दोघांना कोरोना झाल्याने ते विलगीकरणात आहेत. काही दिवसांपूर्वीच गृहमंत्री अनिल देशमुख कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भूजबळ यांना आज कोरोनाची लागण झाली आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टि्वट केले आहे. ते म्हणतात, "सावधान सध्या कोरोनाचा नवीन स्ट्रेन आला आहे, त्याच नाव विधिमंडळ अधिवेशन कोरोना असं आहे. जो शरीरावर कमी पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो." या टि्वटनंतर "आपल्याला महाविकास आघाडी सरकारचे समर्थक ट्रोल करतील, पण जे सत्य आहे ते मी बोलणारच," असेही देशपांडे यांनी स्पष्ट केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह तीन मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याने राष्ट्रवादीचे नेते धास्तावले आहेत. त्यामुळे पक्षाने पुढील दोन आठवडे जनता दरबार हा उपक्रम स्थगित करण्याचा निर्णय
घेतला आहे. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पक्षाने केले आहे.
 
राज्य सरकारमधील मंत्र्यांनाच कोरोनाचा संसर्ग होऊ लागल्याने सर्वच राजकीय पक्षांची चिंता वाढली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने प्रदेश कार्यालयात होणार जनता दरबार हा उपक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील दोन आठवडे जनता दरबार होणार नाही, असे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जनता दरबारमध्ये राष्ट्रवादीचे मंत्री थेट जनता तसेच कार्यकर्त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतात. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख