मंत्र्याचे बंगले नूतनीकरण अन् वाहन खरेदीसाठीची तत्परता आरोग्य सेवेसाठी दाखवली तर... 

अनेक शहरांमध्ये रुग्णांना उपचारासाठी व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेडची कमतरता भासत आहे.
Bala Nandgaonkar .jpg
Bala Nandgaonkar .jpg

मुंबई : कोरोना संक्रमण देशात अक्राळ विक्राळ रुप धारण करताना दिसत आहे. त्यातच महाराष्ट्रातही कोरोनाचे आकडे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अनेक शहरांमध्ये रुग्णांना उपचारासाठी व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेडची कमतरता भासत आहे. त्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी या राज्य सरकारवर टीका केली आहे.   

नांदगावकर ट्वीट करत म्हणाले की ''आज पूर्ण राज्यात व्हेंटिलेटर व ऑक्सिजन ची कमी भासतेय आणि आता सरकार प्रयत्न करत आहे. हे तहान लागल्यावर विहीर खोदण्याचे काम झाले. मधील काळात जर 1000 नविन व्हेंटिलेटर आणले असते तर असा बोजवारा उडाला नसता. मनसे च्या एका कार्यकर्त्याने पदर मोड करून मागील वर्षी 2 व्हेंटिलेटर हॉस्पिटल ला दिले. जी तत्परता मंत्र्याचे बंगले नूतनीकरण व वाहन खरेदी साठी दाखवता तिच तत्परता आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी दाखवल्यास जनतेचे भले होईल''. अशा शब्दात नांदगावकर यांनी राज्य सरकारचा समाचार घेतला.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे १० एप्रिलपर्यंत राज्यातील सक्रिय रुग्णांची तथा अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ५ लाख २३ हजार ७७३ होण्याची शक्यता एफडीए आयुक्त अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केली आहे. तर, ती महिनाअखेर म्हणजेच सुमारे २० दिवसांत दुपटीहून अधिक म्हणजे ११ लाख ९३ हजार ५५७ वर जाण्याची भीती त्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये रुग्णांना बेड मिळणे कठीण झाले आहे. व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. त्यातच रेमडेसिव्हिर इंजेक्शनही मिळणे अवघड झाले आहे. त्याचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होत आहे. यावरुन नांदगावकर यांनी राज्य सरकारला लक्ष केले.

राज्यात गुरुवारी 56 हजार 286 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. तर 36 हजार 130 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 26 लाख 49 हजार 757 रुग्ण  कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात एकूण 5 लाख 21 हजार 317 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.05% झाले आहे.

दरम्यान, सलग तीन दिवसांपासून देशात आढळणाऱ्या रुग्णसंख्येने लाखांचा टप्पा पार केला आहे. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतात गुरुवारच्या २४ तासांत १ लाख ३१ हजार ८७८ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली तर ८०२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. देशात सध्या ९ लाख ७४ हजार २३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com