मनसेचे जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांचे निधन 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कौडगे यांच हैदराबाद येथे निधन झाले.
Sarkarnama Banner (48).jpg
Sarkarnama Banner (48).jpg

नांदेड : नांदेड येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कौडगे यांच वयाच्या 55 व्या वर्षी आज सकाळी हैदराबाद येथे उपचारा दरम्यान निधन झाले.

सुरवातीच्या काळात कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले प्रकाश कौडगे यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून काम केले  होते. त्यांचा जिल्हाप्रमुख म्हणून आदरपूर्वक दरारा होता. कौडगे यांनी सहसंपर्क म्हणून ही काम पाहिले मध्यंतरी त्यांनी मनसेत प्रवेश केला आणि जिल्हाध्यक्ष झाले.

लिंगायत समाजासाठी त्यांनी भरपूर काम केले. कौडगे हे काही दिवसांपासून आजारी होते त्यांच्यावर हैदराबाद येथे उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.

दिलीप बाठे यांचे कोरोनामुळे निधन  

भोर : तालुक्याच्या राजकारणातील मुलूख मैदानी तोफ आणि राजकारणातील गेमचेंजर म्हणून ओळख असलेले दिलीप नामदेव बाठे (वय ६१) यांचे कोरोनामुळे निधन झाले. गेले १४ दिवस ते व्हेंटीलेटरवर होते. त्यांच्यामागे पत्नी, एक विवाहीत मुलगी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. भोर पंचायत समितीचे विद्यमान सदस्य रोहन बाठे यांचे ते वडील होत. ता. २८ मार्चला त्यांची  कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली. त्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. दिलीप बाठे हे जिल्हा कॉग्रेसचे उपाध्यक्ष, शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीचे मुख्य समन्वयक, गुंजवणी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे निमंत्रक आणि कापूरव्होळ (ता. भोर) येथील अमृता उद्योग समूहाचे संस्थापक म्हणून कार्यरत होते. याशिवाय जिल्हा भूविकास बँकेचे ते माजी संचालकही होते. राजकारणातील त्यांच्या भूमिकेवरुन तालुक्यातील राजकारणाला वेगळे वळण मिळत असे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com