बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार राज ठाकरे; भूमिपूजन कोण करतंय महत्वाचं नाही 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन आज पार पडणार आहे.
 Raj Thackeray, Uddhav Thackeray .jpg
Raj Thackeray, Uddhav Thackeray .jpg

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन आज पार पडणार आहे. दादर येथील महापौर निवासस्थानी स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत होणार आहे. या उद्घाटनावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. 

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीटरवरुन शिवसेनेला टोला लागवला आहे. देशपांडे म्हणाले की ''स्वर्गीय बाळासाहेबांचे विचार खर्या अर्थाने पुढे नेण्याचे काम हे राजसाहेबच करत आहेत. हीच मराठी माणसाची भावना आहे. आणि तीच महत्त्वाची, बाकी भूमिपूजन कोण करतंय महत्वाचं नाही'', असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना स्मारकाच्या भूमिपूजनाचे आमंत्रण न दिल्याचे समोर आले आहे. फडणवीस मुख्यमंत्री असतानाच ठाकरे स्मारकाची घोषणा झाली होती. स्मारकासाठी अनेक परवानग्या त्यांच्याच कार्यकाळात मिळाल्या. फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या स्मारकाची घोषणा केली होती. 

गेल्या अनेक दिवसांपासून बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे काम रखडले होते. या स्मारकासाठी मुंबईच्या महापौरांचे निवास्थान ताब्यात घेण्यात आले होते. आता या स्मारकासाठी ४०० कोटींचा निधी देण्यात आला असून आज भूमिपूजन होत आहे. 

बाळासाहेब ठाकरे यांच्या विराट सभांनी गाजलेले शिवाजी पार्क मैदान एका बाजूस तर दुसर्या बाजूला अथांग अरबी समुद्र या दोघांच्या मध्यभागी असलेल्या जुन्या महापौर निवासस्थानी या ऐतिहासिक ठिकाणी हे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक होत आहे. स्मारकामुळे जगभरातील बाळासाहेबांच्या चाहत्यांची प्रतीक्षा पूर्ण होणार, असल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com