ठाकरे, मोदी "एकाच माळेचे मनी.." पेट्रोल-डिझेलचे भाववाढीवरुन मनसेचा टोला

पेट्रोल डिझेल दरवाढीवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली आहे.
2bala_nandagaokar_Uddhav_Tha.jpg
2bala_nandagaokar_Uddhav_Tha.jpg

मुंबई : अनेक शहरात पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव सध्या Petrol-Diesel Rate जवळपास सर्वच ठिकाणी शंभरच्या जवळपास आहे.  परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर काय आहेत, यावर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल-डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी मिळवल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.MNS criticizes the government on petrol diesel price hike

पेट्रोल डिझेल दरवाढीवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली आहे. आपल्या टि्वटमध्ये नांदगावकर म्हणतात की, मागील 15 महिने सातत्याने दरवाढीचा सामना सामान्य जनता करीत आहे. यात केंद्र व राज्य दोघांनी एक पाऊल पुढे येऊन कर त्वरित घटविले पाहिजे. GST विक्रमी 141000 कोटी वर पोचला असतांना, केंद्राने वेळोवेळी लादलेले कर मागे घ्यावे.

"राज्य सरकारने केवळ केंद्राकडे बोट दाखविण्यापेक्षा बाकीच्या राज्यातील इंधन दरांवर नजर मारून आपल्या राज्यात दर कमी करणे हितावह ठरेल. असे न केल्यास जनतेचा आता ठाम विश्वास होईल की दोघेही "एकाच माळेचे मनी" आहेत,"  असा टोला नांदगावकर यांनी राज्य व केंद्र सरकारला लगावला आहे. 

तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही आहे. तर शुक्रवारी पेट्रोलचे दर प्रति लीटर 29 पैसे आणि डिझेलचे दर प्रति लीटर 34 पैशांनी वाढले होते.  मुंबईत पेट्रोलचे दर 98.61 रुपये आणि डिझेलचे दर  90.11 रुपये प्रति लीटर आहेत. गेल्या आठवड्यापासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे. 

हे आहेत आजचे दर?

दिल्ली -पेट्रोल 92.34 रुपये, डिझेल 82.95 रुपये  

मुंबई - पेट्रोल 98.61 आणि डिझेल 90.11  

इंदूर - पेट्रोल 100.46 आणि डिझेल  91.40  

भोपाळ - पेट्रोल 100.38 आणि डिझेल 91.31  

चेन्नई- पेट्रोल 94.09 आणि डिझेल 87.81  

कोलकाता - पेट्रोल 92.44 आणि डिझेल 85.79  

Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com