मनसे नेते बाळा नांदगावकरांच्या फेसबूक अंकाऊंटवरून पैसे मागितले! - MNS Bala Nandgaonkar Facebook Fake Account demand money   | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

मनसे नेते बाळा नांदगावकरांच्या फेसबूक अंकाऊंटवरून पैसे मागितले!

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 29 जून 2021

बाळा नांदगावकर यांनी फेसबूक पोस्ट शेअर करीत माहिती दिली आहे.

मुंबई : फेसबुकवर फेक अकाऊंट तयार करुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या नावे पैशाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच घडला. याप्रकरणी बाळा नांदगावकर यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. नांदगावकर यांनी फेसबूक पोस्ट शेअर करीत याबाबत माहिती दिली आहे. MNS Bala Nandgaonkar Facebook Fake Account demand money  

''अशा कोणत्याही मागणीला कोणीही बळी पडू नये. माझे Blue Tick वाले हे अकाऊंटच अधिकृत आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी,'' असे आवाहन बाळा नांदगावकर यांनी केलं आहे.   

आपल्या फेसबूक पोस्टमध्ये बाळा नांदगावकर म्हणतात...

मित्रानो आजकालच्या या टेकॅनॉलॉजि च्या युगात आपण खुप सावध असले पाहिजे, नुकतेच माझ्या नावाने विविध फेसबुक अकाउंट वर काही भामटयानी अनेकांना मेसेज करून पैसे मागितले. या बद्दल मी रीतसर तक्रार नोंदविली आहे पण कोणीही असो पैसे मागितल्यावर, कधीही कोणाच्याही नावाने मागितले तरी त्याला खात्री केल्याशिवाय अजिबात 1 दमडीही देऊ नये. ज्या 2 नंबर वरून ते मागितले गेले ते खालीलप्रमाणे.
7376801541
8607892210
सामान्य जनतेचे आपल्या नेत्यांवर प्रेम असते व या प्रेमापोटी तो कधी कधी अशा लबाडीला बळी पडू शकतो. परंतु आपणास विनंती आहे की आत्ताच नाही तर इथून पुढेही कधी असा प्रकार झाल्यास अशा मागणी करणाऱ्यास 1 रुपया हि आपण देऊ नये. आपली माझ्यावरील प्रेमा पोटी फसवणूक होऊ नये म्हणून आपणास या पोस्ट द्वारे ह्या सगळ्या बाबतीत सूचित करीत आहे. 

अनिल देशमुखांना अटक होईल ; सर्व पुरावे EDच्या हाती  
मुंबई : ''माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दोन सहकाऱ्यांना अटक झाली आहे. देशमुखांच्या विरोधात सर्व पुरावे ईडीला मिळाले आहेत. देशमुखांना अटक होईल,'' असे अॅड. जयश्री पाटील यांनी सांगितले. अॅड. जयश्री पाटील यांनी देशमुख यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. चैाकशीसाठी देशमुखांना ईडीने समन्स बजावले असून आज देशमुख ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याची शक्यता आहे. अँड. पाटील यांनी माध्यमांना ही माहिती दिली. 

 Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख