पडळकरांनी गांजा घेऊन बिरोबाची खोटी शपथ घेतली होती का ?  शेळकेंचे जशास तसे उत्तर - MLA Sunil Shelke criticizes BJP MLA Gopichand Padalkar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

पडळकरांनी गांजा घेऊन बिरोबाची खोटी शपथ घेतली होती का ?  शेळकेंचे जशास तसे उत्तर

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

प्रसिद्धीसाठी पडळकर बेताल वक्तव्य करीत आहेत, असा हल्लाबोल सुनील शेळके यांनी केला आहे.

पिंपरी : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे गांजा ओढून पत्रकार परिषद घेतात का, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल (ता.२९) सांगली येथे केली होती.  त्या टीकेचा समाचार मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी घेतला आहे. पडळकरांनी गांजा घेऊन बिरोबाची खोटी शपथ घेतली होती का? असा पलटवार शेळकेंनी  केला.

राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असताना केवळ वैयक्तिक प्रसिद्धीसाठी पडळकर बेताल वक्तव्य करीत आहेत, असा हल्लाबोल शेळके यांनी केला आहे. कोरोना प्रतिबंधासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार पडळकर यांनी आरोग्यमंत्र्यांविषयी पातळी सोडून बेताल वक्तव्य करणे म्हणजे कोरोनामध्ये लढणाऱ्या योद्ध्यांची चेष्टा केल्यासारखेच आहे, असे शेळके यांनी म्हटले आहे.

आज राज्याची स्थिती अत्यंत आव्हानात्मक आहे. कोरोनाचा हाहाकार चालू असताना अशा प्रकारची टीका करू नये. आरोग्यमंत्री टोपे यांच्यासह राज्याची सर्व आरोग्ययंत्रणा स्वतःच्या जीवावर उदार होऊन कर्तव्य बजावत आहेत. या पार्श्वभूमीवर वैयक्तिक प्रसिद्धीसाठी केलेली बेताल वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत, असा इशाराही आमदार शेळके यांनी दिला आहे.  
  
पडळकर यांना फक्त प्रसिद्धी मिळवण्यात रस असल्याने ते टीका करताना दिसत आहेत. बेताल वक्तव्ये करून प्रसिद्धी मिळविण्यात ते माहीर आहेत. त्यांनी टीका जरूर करावी, मात्र टीका करताना तोल जाणार नाही, याची काळजी घ्यावी. महाराष्ट्रावरील संकटाच्या काळात मदत करणे शक्य नसेल तर किमान जिभेला लगाम लावावा, असा सल्लाही शेळके यांनी दिला आहे.  
Edited by : Mangesh Mahale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख