रोहित पवार म्हणतात...यामुळे केंद्र सरकारचे मानावे तेवढे आभार कमी आहेत! - MLA Rohit Pawar criticizes the central government | Politics Marathi News - Sarkarnama

रोहित पवार म्हणतात...यामुळे केंद्र सरकारचे मानावे तेवढे आभार कमी आहेत!

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 19 जुलै 2021

इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.

मुंबई : देशामध्ये पेट्रोल (Petrol) डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. या दरांमध्ये घट तर होत नाहीच, त्यांच्यात दररोज वाढच होत आहे असते. त्यामुळे सर्वसामान्य माणूस त्रस्त झाला आहे. राजकारणात मात्र या विषयावरुन टीकाटिप्पणी सुरू आहे. त्यातच आज (ता.१९ जुलै) पासून संसदेचे पावसाळी (Parliament Session) अधिवेशन सुरु झाले आहे. त्यामध्ये विरोधक सरकारला इंधनाच्या मुद्यावरुन घेरणार आहेत. (MLA Rohit Pawar criticizes the central government) 

इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्ष सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर या दरवाढीविरोधात आंदोलनही केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही इंधन दरवाढीवरुन मोदी सरकारवर टीका केली आहे. 

हेही वाचा : नवज्योतसिंग सिद्धू जिंकले..बनले पंजाबचे कॅप्टन!

त्या संदर्भात पवार यांनी ट्विट केले आहे. ते ट्वीटमध्ये म्हणाले की ''महागाईच्या ओणव्यात आज सामान्य माणूस भाजून निघतोय, पण चक्क दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढले नाहीत. कदाचित आजपासून सुरू होणाऱ्या संसद अधिवेशनात टीकेची तीव्रता कमी व्हावी म्हणून ते स्थिर असावेत! पण काही का असेना…यामुळे केंद्र सरकारचे मानावे तेवढे आभार कमी आहेत! 

दरम्यान, कोरोनाविरोधातील लढाईत आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटेल आहे. पावसाळी अधिवेशनाआधी नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लस घेताच कोरोनाविरोधातील लढाईत आपण बाहुबली बनतो, असे सांगितले. 

हेही वाचा : स्वबळाची भाषा बोलणारे काँग्रेस नेते मोदी-पवार भेटीमुळे अचंबित! 

मी आशा करत आहे की तुम्ही सगळ्यांनी लसीचा कमीत कमी एक तरी डोस घेतला असेल. तरी सुद्धा तुम्ही कोरोनाच्या प्रोटोकॉलचे पालन करा. लस घेतल्यानंतर तुम्ही बाहुबली बनता. कोरोनाविरुद्धच्या लढाईत तुम्हाला बाहुबली बनायचे असेल तर हातावर लस घ्यावी लागेल. आता पर्यंत ४० कोटी पेक्षा जास्त लोक कोरोनाविरुद्धच्या लढाईत बाहुबली बनले आहेत. असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

Edited By - Amol Jaybhaye

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख