'किसान सन्मान निधी'चे पैसे तुघलकी पद्धतीने वसूल करायचे सरकारने ठरवले की काय?

रासायनिक खतांच्या किंमती वाढवल्याने शेतकरीअडचणीत सापडला आहे.
 Narendra Modi, Rohit Pawar .jpg
Narendra Modi, Rohit Pawar .jpg

मुंबई : रासायनिक  खतांच्या किंमती वाढवल्याने शेतकरी (Farmers) अडचणीत सापडला आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत केंद्र सरकारने ७०० ते ८०० रुपयांची वाढ केली. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अशातच केंद्राने खतांच्या किमती भरमसाठ वाढवून सामान्यांना वेठीस धरल्याची टीका आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली आहे. (MLA Rohit Pawar criticizes the central government)

त्या संदर्भात रोहित पवार यांनी ट्वीट केले आहे. ते म्हणाले की, ''खतांच्या किंमती भरमसाठ वाढवून 'किसान सन्मान निधी'चे पैसे तुघलकी पद्धतीने व्याजासह वसूल करायचे सरकारने ठरवले की काय अशी शंका येते. कोरोनाच्या काळात उद्योगांचे कंबरडे मोडून बेकारी वाढत असताना शेती हेच एकमेव क्षेत्र आहे जे लोकांच्या जगण्याचा आधार बनलंय. अशा परिस्थितीत खतांच्या किंमती वाढवून हा आधारही सरकारने काढून घेऊ नये आणि या वाढीव किंमती तातडीने कमी कराव्यात, ही विनंती!'' असे पवार म्हणाले आहेत.  

यापुर्वी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी रासायनिक खतांच्या किंमती कमी करण्याची मागणी केली होती. कोरोनामुळे शेतीचे कामे सुरू असली तरी बाजारपेठा बंद असल्याने शेतकरी अडचणीत आहेत. खतांच्या किंमतीत झालेली वाढ अव्वाच्या सव्वा आहे आणि ती शेतकऱ्याला परवडणारी नाही. बऱ्याच खतांच्या किंमतीत ७०० ते ८०० रुपयांची वाढ झाली आहे. सध्याची कोरोनाची स्थिती पाहता ही दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अशी विनंती  भुसे यांनी केली होती.

दरम्यान, जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देखील केंद्र सरकारवर टीका केली होती. ''पेट्रोलच्या किमती झपाट्याने वाढल्याचा धक्का सर्व भारतीयांना लागलाच आहे. मात्र, खतांच्या किमती वाढविण्याचे पाप केंद्र सरकारने केले आहे. कोरोनाने पिचलेल्या शेतकऱ्यांच्या माथी हा दरवाढीचा बोजा टाकत  शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. राष्ट्रवादी या खतांच्या दरवाढीचा निषेध करते. आमचा शेतकरी बांधव याविरोधात आंदोलन करणार आहे. त्या आंदोलनास देशभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल, असा मला विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहील'', असे जयंत पाटील यांनी सांगितले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com