मोदी अन् नड्डा यांच्यासाठी रोहित पवारांचे हिंदीतून ट्विट..निशाणा कुणावर?

विरोधकांनाही मान देण्याची एक स्वतंत्र राजकीय संस्कृती महाराष्ट्रात आहे आणि आजवर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी ती टिकवण्याचा प्रयत्न केला आहे.
 Rohit Pawar, Narendra Modi .jpg
Rohit Pawar, Narendra Modi .jpg

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी हिंदीतून ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना टॅग केले आहे. त्यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या 'एका महान' नेत्याच्या घसरलेल्या राजकीय संस्कृती विषयी त्यांच्याकडे तक्रार केली आहे. (MLA Rohit Pawar complained to Narendra Modi about the BJP leader)

त्यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे. त्यामध्ये ते म्हणाले की ''विरोधकांनाही मान देण्याची एक स्वतंत्र राजकीय संस्कृती महाराष्ट्रात आहे आणि आजवर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी ती टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. पण राज्यात भाजपचा एक 'महान' नेता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यावर टीका करताना खालच्या पातळीवर पोहोचले.'' 

''आपल्याकडे महिलांना देवी म्हणून पूजा करण्याची संस्कृती आहे! पण त्या 'थोर' नेत्याने आपल्या वक्तव्यात महिलांचा अनादरही केला आहे! आश्चर्य म्हणजे राज्यातील अन्य कोणत्याही भाजप नेत्याने त्यांना फटकारले नाही, किंवा त्यावर भाष्य केले नाही.''

''हे केवळ राज्याच्या संस्कृतीशी सुसंगत नाही तर माझ्यासारख्या नवीन पिढीला अशी भीती वाटते की अशा 'महान' नेत्याने केलेल्या मूर्खपणाच्या विधानांमुळे राज्यातील राजकीय संस्कृती खराब होईल. आम्ही हे होऊ देणार नाही, परंतु आपल्यासारख्या वरिष्ठ नेत्यांनीही योग्य पावले उचलली पाहिजेत, ही आमची अपेक्षा आणि विनंती आहे.'' असे म्हटत रोहित पवार यांनी हे ट्वीट नरेंद्र मोजी आणि जे.पी. नड्डा यांना टॅग केले आहे.    

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोलापुरातील पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि महाविकास आघाडीतील नेत्यांवर खालच्या पातळीवर टीका केली होती. त्यावरून त्यांच्या भाषेबद्दल रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त होत होती. त्यानंतर त्यांनी आज थेट नरेंद्र मोदी यांच्याकडे पडळकर यांची तक्रार केली आहे.  

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com