आमदार सरनाईक बेपत्ता असल्याची पोलिसात तक्रार   - MLA Pratap Saranaik missing | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

आमदार सरनाईक बेपत्ता असल्याची पोलिसात तक्रार  

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 19 जून 2021

सरनाईक हे गेल्या १०० दिवसांपासून बेपत्ता असल्याचा भाजपाचा आरोप आहे.

ठाणे : आमदार प्रताप सरनाईक  Pratap Saranaik हे बेपत्ता असल्याची तक्रार आज भाजपकडून वर्तकनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. "आमदार झाले Mr.india" असे बॅनर घेऊन भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. प्रताप सरनाईक सध्या मातोश्रीवर असल्याचा आरोप यावेळी भाजपने केला. राज्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर पसरला होता.  MLA Sarnaik reported missing to police

आमदार सरनाईक हे गेल्या १०० दिवसांपासून बेपत्ता असल्याचा भाजपाचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपने ठाणे येथील वर्तकनगरमध्ये आंदोलन केले. भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे आणि ५० रहिवाशांनी मानवी साखळी करुन हे आंदोलन केले. 

"ओवळा माजीवडा मतदारसंघाचे आमदार कुठल्याही प्रकारची मदत करीत असताना दिसत नाही. ते जवळपास शंभर दिवसापासून बेपत्ता आहे. ते कुठे हरवले आहेत, असा उगाच संशय येत आहे. त्यांना कुणी गायब केले आहे का. याचा तपास करुन सरनाईक यांचा शोध घ्यावा," अशी मागणी तक्रारीमध्ये करण्यात आली आहे. मिलिंद नईबागकर आणि हरीष जोशी यांनी वर्तकनगर पोलिस ठाण्यात ही तक्रार केली आहे.
बाळासाहेबांमुळे तुमचे वडील मोठे झाले, उपकार विसरु नका..खैरेंनी राणे बंधूंना फटकारले..
मुंबई  :  तीन दिवसांपूर्वी दादरच्या शिवसेनाभवनासमोर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा  झाल्यानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांमधील शाब्दिक चकमकी अजूनही सुरु आहेत. या वादावरुन भाजप नेते निलेश राणे व नितेश राणे यांनी शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला. त्याला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनी आज ते माध्यमांशी बोलत होते.  चंद्रकांत खैरे म्हणाले की, ऐन निवडणुकीच्या वेळी भाजप नेते नारायण राणे शिवसेनेला सोडून काँग्रेसमध्ये गेले. तेव्हा निलेश राणे हे सरकारी गाडी घेऊन फिरत होते.  त्यावेळी आम्ही निलेश राणेंना दम भरला होता. निलेश राणे, नितेश राणे हे काहीही करु शकत नाही, आपण कोणामुळे मोठे झालो आहोत, हे ते विसरले आहेत. शिवसेना प्रमुख यांच्यामुळे नारायण राणे मोठे झाले. त्यामुळे तुम्ही काहीही बोलू नका आणि उपकार विसरु नका. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख