आमदार नितेश राणेंचे उद्धव ठाकरेंना व्हॅलेंटाईन डे गिफ्ट  - MLA Nitesh Rane Valentine Day gift to cm Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार नितेश राणेंचे उद्धव ठाकरेंना व्हॅलेंटाईन डे गिफ्ट 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजपला वैभववाडीत शिवसेनेने जोरदार धक्का दिला आहे. भाजपचे वैभवाडीतील ७ नगरसेवक शिवसेननेत प्रवेश करत आहेत. 

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजपला वैभववाडीत शिवसेनेने जोरदार धक्का दिला आहे. भाजपचे वैभवाडीतील ७ नगरसेवक शिवसेननेत प्रवेश करत आहेत. शहांच्या दौऱ्यानंतर भाजप नगरसेवक फुटल्याने या घटनेची राज्यभरात चर्चा होत आहे. नारायण राणे यांच्या वर्चस्वाला धक्का देण्याचं काम शिवसेनेकडून केलं जात आहे, त्यामुळे आमदार नितेश राणेंनी ट्विटच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. 

नितेश राणेंनी आपल्या ट्विटरवरुन व्हिडीओ पोस्ट करत म्हटलंय की, "वैभववाडीचे काही नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची बातमी वाचली आहे, व्हॅलेंटाईन डे काही दिवसांवर आहे आणि शिवसेना आमचं जुनं प्रेम आहे, जुन्या प्रेमाला कधी विसरायचं नसतं असं सगळेच म्हणतात. वैभववाडीची सध्या परिस्थिती पाहिली तर शिवसेनेकडे मूळ शिवसैनिक सापडणार नाही.

येणाऱ्या निवडणुकीत कोणी उमेदवार भेटणार नाहीत. शिवसेना पक्ष हा हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे, बाळासाहेब ठाकरेंवर आमचं नितांत प्रेम आहे, त्यामुळे शिवसेना पक्षाची अशी अवस्था होऊ नेय, अशी माझ्यासारख्या बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या कुटुंबाची भावना आहे. म्हणून हे ७ नगरसेवक व्हॅलेंटाईन डे निमित्त उद्धव ठाकरेंकडे पाठवतोय'' असा उपरोधीक टोला नितेश राणेंनी लागावला आहे. 

अमित शहांची पाठ फिरताच शिवसेनेचा भाजपला दणका 

नारायण राणेंना केंद्रात मंत्रीपद मिळण्याची शक्यता

''मेडिल कॉलेजच्या कामासाठी नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन लावला होता, तेव्हा उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद देत मेडिकल कॉलेजच्या फाईलवर सही केली, आम्ही उद्धव ठाकरेंना काही देऊ शकत नाही. दिलं तरी ते घेणार नाही, गुच्छ दिला तरी ते स्वीकारणार नाहीत. त्यामुळे हे ७ नगरसेवक त्यांना आभार आणि धन्यवाद मानण्यासाठी पाठवत आहे, त्याचा स्वीकार त्यांनी करावा'' असं सांगत नितेश राणेंनी व्हॅलेंटाईन डे निमित्त उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देत शिवसेनेला चिमटा काढला आहे.  

 

 

Edited By - Amol Jaybhaye

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख