उद्धव ठाकरे हेच सचिन वाझेचे राजकीय 'बॉस'...

मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी काल गौप्यस्फोट केला होता.
MLA Nitesh rane says CM Uddhav Thakeray is sachin vazes political boss
MLA Nitesh rane says CM Uddhav Thakeray is sachin vazes political boss

मुंबई : पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना परत घेण्यासाठी मी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांचा मला फोन आला होता, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्याआधारे भाजप आमदार नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. उद्धव ठाकरेच सचिन वाझेचे राजकीय बॉस असल्याचा आरोप राणे यांनी केला आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सचिन वाझे आणि शिवसेनेचा संबंध काय? असा सवाल करत निलंबित वाझे यांना पोलिस दलात पुन्हा घ्यावे, यासाठी २०१८ मध्ये आपण मुख्यमंत्री असतांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता, शिवाय त्यांचे काही मंत्री देखील माझ्याकडे आले होते, असा गौप्यस्फोट केला.

फडणवीस यांच्या या गौप्यस्फोटानंतर नितेश राणे यांनी आज ट्विट करून मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर थेट आरोप केले आहेत. ''देवेंद्र फडणवीस यांच्या कालच्या पत्रकार परिषदेनंतर वाझेचे पॉलिटिकल बॉस कोण आहेत, हे स्पष्ट होते. मागील सरकारवेळी त्याला पुन्हा पोलिस दलात घेण्यासाठी कोणी सांगितले? नुकत्याच झालेल्या अधिवेशनात त्यांची वकिली कुणी केली? ते बिन लादेन नाहीत, असे कोण म्हणाले? ते उद्धव ठाकरे आहेत,'' असे ट्विट राणे यांनी केले आहे. 

दरम्यान, काल पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले, वसई-विरारमध्ये खंडणी मागणाऱ्यांचे जे रॅकेट सापडले होते, त्यामध्ये एपीआय सचिन वाझे यांचे नाव होते. २००४ मध्ये खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे वाझे यांना उच्च न्यायालयाच्या आदेशाने निलंबित करण्यात आले होते. २००७ मध्ये वाझे यांनी व्हीआरएस साठी अर्ज केला होता. पण त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा, निलंबनाची कारवाई होऊन चौकशी चालू असल्यामुळे त्यांना व्हीआरएस नाकारण्यात आली होती.

राज्यात आमची सत्ता आली आणि मी मुख्यमंत्री झालो तेव्हा सचिन वाझे यांना सेवेत पुन्हा घेण्यासाठी माझ्यावर शिवसेनेचा दबाव होता. उद्धव ठाकरे यांनी स्वतः मला फोन केला होता, त्यांचे काही मंत्री देखील माझ्याकडे आले होते. परंतु मला वाझे यांची संपु्र्ण माहिती असल्यामुळे मी या संदर्भात अॅडव्होकेट जनरल यांच्यांशी चर्चा केली. तेव्हा हायकोर्टाच्या आदेशाने निलंबन झालेले असल्यामुळे व वाझेंची चौकशी सुरू असल्याने त्यांना सेवेत घेणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी मला सांगितले होते. त्यामुळे मी वाझेंना परत घेतले नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com