तीन महिने वापरातील वास्तुचे उद्घाटन करुन मुख्यमंत्र्यांची फसगत कशाला?

मात्र, हे मनाला न पटणारे आहे.
 Ashish Shelar, Uddhav Thackeray .jpg
Ashish Shelar, Uddhav Thackeray .jpg

मुंबई : महाराष्ट्र दिना (1 मे) पासून गेले तीन महिने जी वास्तु वापरात आहे. त्या वास्तुचे उद्घाटन करुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची फसगत व्हावी आणि कार्यक्रमाचे हसे व्हावे, अशा प्रकारे दुर्दैवी वर्तन मुंबई महापालिकेने का करुन दाखवले? असा सवाल भाजप नेते आमदार अॅड आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला. या कार्यालयाच्या निर्माणात शिवसेनेचा कुठलाच सहभाग नव्हता. मग श्रेय घेण्यासाठी अट्टाहास कशाला? असा टोला शेलार यांनी लगावला. (Ashish Shelar criticizes Uddhav Thackeray)  

लोकार्पण सोहळा पार पडला त्या एच पश्चिम महापालिका कार्यालयाची जुनी वास्तु अपुरी पडत असल्याने स्थानिक आमदार, एएलएम, संस्था, नागरिकांची मागणी पाठपुराव्याने ही नवी अद्ययावत इमारत उभी राहिली 1 में पासून ती लोकांसाठी खुली ही करण्यात आली. आता अचानक तीन महिने वापरात असलेल्या इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते आहे. महापालिकेतील सत्ताधारी श्रेय घेण्याच्या नादात काय करुन दाखवतील याचा नेम नाही. मुख्यमंत्र्यांना या इमारती बाबत वास्तव माहिती न देता अशा प्रकारे कार्यक्रम करुन महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी स्वतःचे हसे तर केलेच सोबत मुख्यमंत्र्यांची फसगत केली आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे, असा टोला शेलार यांनी लगावला.  

उत्तर महाराष्ट्र दौऱ्यात जळगावला नियोजित कार्यक्रमात असताना रात्री दहा वाजता अचानक मला या कार्यक्रमाचे निमंत्रण दुरध्वनीवरुन मिळाले. त्यामुळे कार्यक्रमाला पोहचणे शक्य झाले नाही. मुख्यमंत्री आमच्या विभागात येत असताना त्यांच्या कार्यक्रमाला स्थानिक आमदार म्हणून गैरहजर असलो तरी जनमाणसात योग्य संदेश जावा म्हणून मी स्थानिक नगरसेवक अलका केळकर यांच्या हातून पुष्पगुच्छ पाठवून त्यांचे स्वागत केले. 

मात्र, हे मनाला न पटणारे आहे. मुंबई महापालिका श्रेय वादाच्या नादात हे असे जे काही करुन दाखवते आहे त्या बद्दल खेद वाटतो आहे. मुख्यमंत्री पदाचा सन्मान राखणे आपले कर्तव्य नाही का? केवळ करुन दाखवलेच्या नादात तीन महिने लोकसेवेत असलेल्या इमारतीचे लोकार्पण रातोरात ठरवून मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणणे योग्य आहे का?  असे शेलार म्हणाले, महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी करुन दाखवलेच्या नादात उद्या अचानक गेट वे आँफ इंडियाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आयोजित करु नये म्हणजे मिळवले, असे शेलार म्हणाले.    


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com