'ब्लू टीक' पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे लक्ष द्या! 

ट्वीटरवरील 'ब्लू टीक' असेल किंवा कोरोना काळातील लोकांचे लसीकरण असेल यावरून केंद्रसरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे.
 Nawab Milk  .jpg
Nawab Milk .jpg

मुंबई : भारतामध्ये समाजमाध्यमांसंदर्भातील नवीन नियमांवरुन ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरु आहेत. त्यातच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांच्या वैयक्तिक ट्विटर हॅण्डल आणि सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या ट्विटर हॅण्डलसमोरील ब्लू टीक हटवल्याने या वादात पुन्हा एकदा नवी ठिणगी पडली. या वादावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Milk) यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. (Minority Minister Nawab Milk criticizes BJP)

नवाब मलिक म्हणाले की 'ब्लू टीक' आणि कोरोना लसीकरण यातील फरक पहिल्यांदा केंद्रसरकारने समजून घ्यावा. 'ब्लू टीक' पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे जास्त लक्ष द्या, असा टोला नवाब मलिक यांनी भाजपला लगावला आहे. ट्वीटरवर संपूर्ण भाजप आणि केंद्रसरकार 'ब्लू टीक' ची लढाई लढताना दिसत आहे, तर दुसरीकडे देशातील जनता लसीकरणाची लढाई लढत असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. ट्वीटरवरील 'ब्लू टीक' असेल किंवा कोरोना काळातील लोकांचे लसीकरण असेल यावरून केंद्रसरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करून केंद्रसरकार आपल्याच अहंकारात मश्गुल असल्याचेही नवाब मलिक म्हणाले. 

प्रकरण काय?

ट्वीटरने शनिवारी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अकाऊंटवरील ब्लू टिक हटवली होती. याबाबत माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ट्विटरकडे नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणी ट्विटरवर योग्य कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला होता. त्यानंतर ट्विटरने आपली चूक दुरुस्त केली.  टि्वटरने केवळ व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर हॅण्डलवरीलच ब्लू टिक काढलेली नाही, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विटरने 'ब्लू टिक' काढला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांच्या खात्यावरील ब्लू टिक काढून टाकली असल्याचे संघाचे राजीव तुली यांनी म्हटले होते. 

ट्विटरच्या अटींनुसार, जर कोणी त्याच्या हँडलचे नाव बदलले (@ हँडल) किंवा वापरकर्त्याने त्याचे खाते ज्या पद्धतीने वेरिफाई केले त्या पद्धतीने वापरत नाही. तर या प्रकरणात निळा टिक म्हणजे blue verified badge काढून टाकते. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या या ट्विटर अकाऊंटवरून गेल्या 11 महिन्यांपासून कोणतेही ट्विट केलेले नाही. या खात्यात अखेर 23 जुलै 2020 रोजी ट्विट केले गेले होते. 

जुलै 2020 पासून ट्विटर अकाऊंट वापरात नसेल, तर ते अकाऊंट आपोआप इनअॅक्टीव्ह होते आणि त्यावरील ब्लू टिक गायब होते, असे ट्विटरने म्हटले होते. ट्विटरच्या नियमांनुसार एखाद्या खात्याचे नाव बदलले गेले असेल किंवा एखादे अकाऊंट सक्रिय नसेल वा अपडेट होत नसेल, तर ते अनव्हेरिफाइड केले जाते आणि ‘ब्लू टिक’ही हटवली जाते. 

एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या ट्विटर हॅण्डलसमोर ब्लू टिक असेल पण नंतर त्याने कार्यालय सोडल्यास आणि व्हेरिफिकेशनचे निकष पूर्ण केले जात नसतील, तर ब्लू टिक हटवली जाते. उपराष्ट्रपती झाल्यापासून व्यंकय्या नायडू हे उपराष्ट्रपतींच्या हॅण्डलचाच वापर करत आहेत. त्यांच्या वैयक्तिक ट्विटर हॅण्डलचा वापर होत नसल्यामुळे ब्लू टिक काढून टाकण्यात आली असावी, असे सांगितले जात आहे. 
 
Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com