महाराष्ट्राला संकटात आणण्याचं काम  मंत्र्यांनी करु नये...

मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. पण, मराठा समाजाला आरक्षण देताना आमच्या आरक्षणाला धक्क लावू नका. आमच्या आरक्षणाला धक्का लावल्यास आम्ही शांत बसणार नाही.
Vijay Vadettiwar, Nilesh Rane .jpg
Vijay Vadettiwar, Nilesh Rane .jpg

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. पण, मराठा समाजाला आरक्षण देताना आमच्या आरक्षणाला धक्क लावू नका. आमच्या आरक्षणाला धक्का लावल्यास आम्ही शांत बसणार नाही, असे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले होते. त्यावर समाजात भांडण लावून महाराष्ट्र संकटात आणण्याचं काम कुणीही करू नये. राज्य सरकारातला एक मंत्री जिरवायची भाषा करतो हे योग्य नाही. असा टोला नीलेश राणे यांनी वडेट्टीवारांना लगावला आहे.   

पक्षाच्या पलीकडे लढाई जात नाही तोपर्यंत यश मिळणार नाही. बाळासाहेब सराटे नावाचा व्यक्ती आमचे हक्क हिरावण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही वकील दिला जर तो दिला नसता तर ओबीसचं आरक्षण रद्द झालं असतं. असा  आरोपही वडेट्टीवार यांनी केला होता. ओबीसी समाजाच्या वतीने (ता.२४ जानेवारी ) रोजी जालण्यात मोर्चाच्या काढण्यात आला होता. यावेळी मागण्यांचे निवेदन सरकारच्या वतीने वडेट्टीवार यांनी स्वीकारले, त्यावेळी ते बोलत होते.   

नीलेश राणे आपल्या टि्विटमध्ये म्हणाले की, समाजात भांडण लावून महाराष्ट्र संकटात आणण्याचं काम कुणीही करू नये. राज्य सरकारातला एक मंत्री जिरवायची भाषा करतो हे योग्य नाही. कुठल्या समाजाला काय मिळेल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या अधिकारानुसारच मिळेल. कुठल्याही मंत्र्याने विचार करून बोललं पाहिजे. असे म्हणात त्यांनी वडेट्टीवार यांच्यावर निशाना साधला आहे. 

वडेट्टीवार काय म्हणाले होते? 

ओबीसींच्या जनगणनेचा मार्ग मोकळा करा आणि आम्हाला न्याय द्या, असे आवाहन राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारला केले. त्याच बरोबर मुख्यमंत्र्यांकडेही त्यांनी ओबीसींच्या जनगणनेची मागणी केली. वेळ पडल्यास विधानसभेत जनगणनेचा प्रस्ताव आणण्याची मागणी करू, असेही वडेट्टीवार म्हणाले. 

मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. पण, मराठा समाजाला आरक्षण देताना आमच्या आरक्षणाला धक्क लावू नका. आम्ही कोणाच्या हक्काचे मागत नाही. आमच्या हक्काचे आम्हाला द्या, आमच्या हक्काचे कोणी काढून घेत असेल तर आम्ही शांत बसणार नाही, अशा इशारा वडेट्टीवार यांनी दिला. 

या मेळाव्याला सर्व पक्षांचे नेते उपस्थित आहेत. त्यामुळे ओबीसींच्या लढाईला पक्षीय स्वरुप देऊ नका. आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही. गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसींच्यासाठी मोठे काम केले त्यांच्या कर्तृत्वाला सलाम आहे. छगन भुजबळ यांनी ओबीसींच्यासाठी काम केले आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. 

रोहित पवार काय म्हणाले होते?  

मराठा आरक्षणाची मागणी करताना दुसऱ्या समाजाचा आम्हाला हक्क पाहिजे, असे कोणीही बोलत नाही. मात्र, काही जण ओबीसी समाजात वेगळ्या प्रकारचा अपप्रचार करून तेढ निर्माण करीत आहेत. अशा लोकांना शोधून जाब विचारायला हवा, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मांडली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com