जागतिक मदत कुठे चालली....विश्वजित कदमांचा केंद्र सरकारला सवाल...महाराष्ट्राला झुकते माप द्या...

कोरोनासाठी येणारी मदत कुठे चालली आहे,"असा सवाल विश्वजित कदम यांनीकेला आहे.
Sarkarnama Banner - 2021-05-08T171050.833.jpg
Sarkarnama Banner - 2021-05-08T171050.833.jpg

सांगली  : "जागतिक पातळीवरून कोरोनासाठी येणारी मदत कुठे चालली आहे,"  असा सवाल कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केंद्र सरकारला केला आहे.  राज्यात निर्माण झालेल्या ऑक्सिजन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारती विद्यापीठ पुणे आणि सांगली या ठिकाणी जाऊन लवकरच ऑक्सीजन जनरेशन प्लांटचे निर्मिती करणार असल्याचे  त्यांनी स्पष्ट केले. Minister of State for Agriculture Vishwajit Kadam criticizes the Central Government


जिल्ह्याला सध्या दररोज 40 टन ऑक्सिजनची गरज आहे. कर्नाटकच्या बेल्लारी येथून होणार 10 टनाचा ऑक्सिजन पुरवठा अचानक बंद झाला. त्यामुळे 2-3 दिवसांपूर्वी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र, आपण वैयक्तिक पातळीवर ऑक्सिजन कंपन्यांशी चर्चा व पाठपुरावा करून तो सोडवला आहे. त्यामुळे आता 44 टन इतके ऑक्सिजन मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्य स्थितीत ऑक्सिजनचा तुटवडा नाही.  येत्या काळात जिल्ह्यात ऑक्सिजनचा कोणताही तुटवडा निर्माण होऊ देणार नाही, अशी ग्वाही मंत्री कदम यांनी दिली.

जिल्ह्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचे 1200 डोस उपलब्ध आहेत. तर कोरोनाच्या या स्थितीत आणि भविष्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयात येत्या काही दिवसात एकूण 125 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर बसविण्यात येणार आहेत. त्याच बरोबर सध्या शासकीय रुग्णालयात 300 व्हेंटीलेटर उपलब्ध असून आणखी 50 नवीन व्हेंटीलेटर दाखल होणार आहेत.  जिल्ह्याचे जे 300 कोटीचे बजेट आहे, त्यापैकी 10 टक्के म्हणजे 30 कोटी निधी कोरोनावर खर्च करण्यात येत आहे, असे कदम यांनी सांगितले. 


सध्याच्या देशातल्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये जागतिक पातळीवरून मोठ्या प्रमाणात भारताला मदत होत आहे. ऑक्सिजन, रेमडेसिविर, लस,अशा अनेक पातळ्यांवर इतर देशातून भारताला मदत मिळत आहे. मात्र, ही मदत कुठे चाललेली आहे ? असा सवाल करत महाराष्ट्र सध्याच्या कोरोनाच्या गंभीर परिस्थितीतून जात असल्याने महाराष्ट्राला झुकते माप द्यायला हवं, असं मत कदम यांनी यावेळी व्यक्त केले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com