आंतरराज्य वाहतुकीबाबत एकनाथ शिंदेनी दिली महत्वाची माहिती...

राज्यात कोरोनाचा कहर वाढत असल्याने राज्य सरकारकडून एक-दोन दिवसांत कडक लॅाकडाऊन लागू केला जाण्याची शक्यता आहे.
Minister Eknath Shinde says about restrictions on interstate transport
Minister Eknath Shinde says about restrictions on interstate transport

मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर वाढत असल्याने राज्य सरकारकडून एक-दोन दिवसांत कडक लॅाकडाऊन लागू केला जाण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात बाहेरील राज्यांतून होणाऱ्या वाहतुकीवरही निर्बंध आणले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज याबाबतचे संकेत दिले.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रोजचा रुग्णांचा आकडा 65 हजारांच्या पुढे गेला आहे. दररोज त्यामध्ये वाढच होत असल्याने अनेक भागात रुग्णांना बेड मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॅाकडाऊनचे संकेत दिले आहेत. राज्यात 15 एप्रिलपासून कडक लॅाकडाऊन लागण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अन्य राज्यांतून महाराष्ट्रात येणारे प्रवासी, वाहनांवरही बंधने टाकली जाण्याची शक्यता आहे.

राज्य सरकार आंतरराज्य वाहतुकीबाबत निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे. याविषयी बोलताना शिंदे म्हणाले, राज्यात कडक निर्बंध आणून कोरोना कंट्रोल करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. इतर राज्यातून येणाऱ्या लोकांवर देखील निर्बंध लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कोरोना रोखण्यासाठी जे शक्य आहे ते ते सरकार करेल. लोकांचा जीव वाचविणे, याला सरकारचे प्राधान्य आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

राज्यात कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. लोकांना बेड मिळत नाहीत. रेमडेसिविरचा तुटवडा आहे. अनेक भागात अॅाक्सीजनही मिळत नाही. त्याबाबत उपाययोजना केल्या जात आहेत. इतर राज्यातून ऑक्सिजनची मागणी करण्यात आली आहे. डेथ रेट कमी करणे तसेच सुविधा वाढवणे हे आव्हान राज्यासमोर असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी प्रमुख नेते, विरोधी पक्ष, तज्ज्ञांशी चर्चा केली आहे. टास्क फोर्सची काल बैठक बोलालवी होती. आजही ते काही जणांशी चर्चा करणार आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बध लावण्याशिवाय पर्याय नाही. त्याबाबतचा मुख्यमंत्री निर्णय घेतील. लोकांचा जीव वाचवण्यासाठी प्राथमिकता असेल, असे शिंदे यांनी नमूद केले.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com