minister chagan bhujbal announced cid inquiry of black marketing  | Sarkarnama

छगन भुजबळांनी केली ‘सीआयडी’ चौकशीची घोषणा

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 29 जुलै 2020

दळाच्या काळाबाजार व अवैध विक्री व्यवहाराची चौकशी सी.आय.डी. मार्फत करण्यात येणार असून दोषींना कठोरात कठोर शिक्षा करण्यात येईल.

मुंबई : सोनेगाव, ता. जामखेड, जिल्हा अहमदनगर येथील स्वस्त धान्य दुकानातील तांदळाच्या अवैध व्यवहाराबाबत तसेच शेगाव तालुक्यातील बुलढाणा-अकोला सीमेवर 410 कट्टे भरलेला तांदूळाचा ट्रक पकडून जप्त करण्यात आला. या सर्व प्रकरणाची सी.आय.डी. मार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना करत राज्यातील
नागरिकांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच काळाबाजार करणाऱ्यांवर विशेष पथकांच्या माध्यमातून लक्ष ठेऊन कारवाई देखील करण्यात येत आहे. 

राज्यातील एकही नागरिक अन्नधान्यांपासून वंचित राहणार नाही यासाठी राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. तसेच या काळामध्ये अन्न,धान्याचा काळाबाजर करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या पथकातील पोलीसांनी जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथून गुजरातला जाणारा स्वस्त धान्य दुकानातील 24 टन तांदूळ भरलेला ट्रक पकडला होता. या तांदळाच्या अवैध विक्री व्यवहाराची तसेच शेगाव तालुक्यातील बुलढाणा-अकोला सीमेवर 410 कट्टे भरलेला तांदूळाचा ट्रक पकडून जप्त करण्यात आला. या तांदळाच्या काळाबाजार व अवैध विक्री व्यवहाराची चौकशी सी.आय.डी. मार्फत करण्यात येणार असून दोषींना कठोरात कठोर शिक्षा करण्यात येईल. त्यामुळे राज्यातील गैरव्यवहारांना आळा बसणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.

सिध्दार्थ महाविद्यालयाला निधी मिळणार

मुंबई : सिध्दार्थ महाविद्यालयाच्या आनंदवन इमारतीच्या दुरुस्तीसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन आज सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. 

या प्रश्नावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हे आश्वासन दिले. तसेच सिद्धार्थ कॉलेजच्या मोडकळीस आलेल्या या वास्तूची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करण्याचेही मुंडे यांनी यावेळी मान्य केले. फोर्ट येथील सिद्धार्थ कॉलेजच्या इमारतीत अनेक ठिकाणी पाणी गळत असून त्यामुळे इमारतीलाही धोका निर्माण झाला आहे. या इमारतीच्या विकासकामाचा सुमारे नऊ कोटी रुपयांचा प्रस्ताव सव्वा वर्षापासून मंत्रालयात प्रलंबित आहे, यासंदर्भांत आज ही बैठक झाली. हा निधी तात्काळ मिळाला नाही तर महाविद्यालयासमोर धरणे धरण्याचा इशाराही दरेकर यांनी दिला होता. बाबासाहेब आंबेडकरांच्या या कॉलेजविषयी आपणासही आस्था असल्याचे सांगत मंत्री धनंजय मुंडे यांनी विकासकामांचा प्रलंबित प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन आजच्या बैठकीत दिले.

Edited by swarup jankar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख