सिंथेटिक ट्रॅकवर मंत्र्यांच्या मोटारी..भाजपकडून निषेध 

महेश लांडगे यांनी हा प्रकार दुर्दैवी असल्याचे सांगत त्यातून राजकीय व्हीआयपी संस्कृतीचे दर्शन घडल्याचे मत व्यक्त केले.
4mahesh_20landge.jpg1_.jpgfff.jpg
4mahesh_20landge.jpg1_.jpgfff.jpg

पिंपरीः बालेवाडी, पुणे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या सिंथेटिक ट्रॅकवर शनिवारी (ता. २६) मंत्र्यांच्या मोटारी उभ्या करण्यात आल्याच्या घटनेवर दोन दिवसानंतरही प्रतिक्रिया येतच आहेत.  सोमवारी (ता. २८) या प्रकाराचा पुणे भाजप व पिंपरी-चिंचवड भाजपने निषेध केला. भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष महेश लांडगे यांनी हा प्रकार दुर्दैवी असल्याचे सांगत त्यातून राजकीय व्हीआयपी संस्कृतीचे दर्शन घडल्याचे मत व्यक्त केले. Minister car on synthetic tack Protest from BJP Mahesh Landage

सर्व निषेधाच्या प्रतिक्रिया या भाजप, त्यांचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधींकडूनच येत आहे, हे विशेष. केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी सोमवारी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. पुण्यातील भाजपनेही आज या घटनेचा निषेध केला. त्यानंतर पिंपरी चिंचवड भाजपनेही लगेच या घटनेचा निषेध केला. हे आयतेच कोलित त्यांच्या हाती महाविकास आघाडीविरुद्ध सापडले आहे.

म्हाळुंगे-बालेवाडीत उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय  क्रीडा विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी शरद पवार, क्रीडामंत्री सुनील केदार, राज्यमंत्री अदिती तटकरे हे शनिवारी (ता.२६) गेले होते. त्यावेळी त्यांच्या गाड्या चालण्यास सुद्धा परवानगी नसलेल्या पाच कोटी रुपयांच्या अॅथलेटिक्सच्या सिंथेटिक ट्रॅकवर उभ्या करण्यात आल्या होत्या. त्याचे पडसाद राज्यच नाही, तर राष्ट्रीय पातळीपर्यंत उमटत आहेत. आमदार लांडगे यांनी एक खेळाडू म्हणून या घटनेचा तीव्र निषेध केला.स्पर्धा व सरावाव्यतिरिक्त प्रवेश नसलेल्या या ट्रॅकवर नियम डावलून गाड्या चालवल्या गेल्या. क्रीडापटूसाठी ट्रॅक, मैदान हे पवित्र असते. त्याचे पावित्र्य जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. म्हणून एक खेळाडू म्हणून या घटनेचा तीव्र निषेध करीत असल्याचे लांडगे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

फडणवीस सारखी दुटप्पी व्यक्ती मी पाहिली नाही..  
मुंबई  : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आज मुंबईतील नालेसफाई, महापालिकेचा कारभार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली. महापालिकेच्या कारभारावर त्यांनी जोरदार टीका केली.  मुंबई महानगर पालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.  
 Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com