मुंबई : सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांनी थेट परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर आरोप त्यांनी मुंबई पालिकेतील ठेकेदारांकडून पैसे गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप केला. तसेच तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा जबाब त्यांनी पत्र लिहून न्यायदंडाधिकाऱ्यांना दिला आहे. मुंबई महापालिकेतील वादग्रस्त 50 कंत्राटदारांकडून प्रत्येक दोन कोटी रुपये गोळा करण्याचे काम परब यांनी सांगिल्याचा दावा वाझे यांनी केला.
अनिल परब यांनी हे आरोप फेटाळले आहेत सरकारची बदनामी करण्यासाठी हे पत्र दिले आहे. सचिन वाझे कस्टडीत आहे.त्याने अजून कोणाकडे तक्रार केली नाही. अशी पत्रे बाहेर काढून सरकारला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. वाझे काही काळ शिवसेनेत होते. प्रदीप शर्मा पण शिवसेनेचे उमेदवार होते मान्य करतो. पण वाझेंना शिवसेनेने अस काम करायला सांगितलं नाही. केंद्रीय यंत्रणाच वापर कसून शिवसेनेच्या मागे ससेमिरा लावला आहे. बदनामीचा हा लेटर बॉम्ब काढून आम्हाला काही होणार नाही. मला चौकशीला बोलवा मी दोषी असेल तर मला माझे पक्षप्रमुख फासावर लटकवतील.मी पूर्णपणे कायदेशीर लढणार मी लढाईच्या तयारीत आहे. अश्या धमक्यांना घाबरत नाही.मला टार्गेट करून मुख्यमंत्र्याना टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे, असे प्रत्युत्तर परब यांनी दिले.
वाझे यांचे आरोप काय?
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्याप्रमाणेच सचिन वाझेंकडूनही अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप झाले आहे. सचिन वाझे यांच्या पत्रावरून पुढील चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. या पत्राची सत्यता तपासून कारवाई करण्याचेही कोर्टाने नमूद केले आहे. एनआयए बरोबरच आता सीबीआय कडूनही याबाबत तपासाला सुरूवात होणार आहेत.
वाझे यांनी पत्रात शरद पवार यांचाही उल्लेख केला आहे. आपल्या नियुक्तीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध होता. ते आपल्याला हटवू इच्छित होते. त्यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी अनिल देशमुख यांनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती,” असा दावा वाझे यांना पत्रात केला आहे. त्यांनी हे पत्र `एनआयए`ला दिले आहे.
ऑक्टोबर २०२०मध्ये देशमुख यांनी मला सह्याद्री अतिथी गृहावर बोलावलं होतं. आणि शहरातील १ हजार ६५० रेस्तराँ आणि बार यांच्याकडून वसूली करण्यास सांगितलं होतं. त्यावेळी हे आपल्या क्षमतेपलिकडे असल्याचे आपण त्यांना सांगितलं होतं. जुलै-ऑगस्ट २०२० मध्ये अनिल परब यांनी त्यांच्या शासकीय बंगल्यावर बोलावलं होतं. डीसीपींच्या बदल्या होण्याच्या तीन-चार दिवसांआधी परब यांनी बोलावलं होतं. सुरूवातीला SBUTबद्दलच्या तक्रारीची चौकशी करण्यास सांगितलं. त्यानंतर विश्वस्तांना घेऊन येण्यास सांगितलं होतं. त्याचबरोबर चौकशी थांबवण्यासाठी परब यांनी SBUT ५० कोटी रुपये मागितले होते. हे काम करण्यास आपण असमर्थता दर्शवली. कारण आपल्याला SBUTबद्दल माहिती नव्हती. त्याचबरोबर चौकशीवरही आपल कोणतंही नियंत्रण नव्हतं,” वाझे यांनी पत्रात म्हटलं आहे.
देशमुख यांनी मला १६५० बार आणि रेस्तराँकडून प्रत्येकी ३ ते ३.५ लाख रुपयांची वसूली करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर मी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना भेटलो होतो आणि त्यांच्याकडे संशय व्यक्त केला होता. कुठल्या तरी खोट्या वादात अडकू अशी भीती व्यक्त केली होती. त्यांनी मला धीर दिला आणि कुणाकडूनही आणि कुणासाठीही अवैध पैसे वसुलीत सहभागी न होण्यास सांगितलं होतं,” असं सांगत वाझे यांनी आपल्याला न्याय देण्यात यावा, असं पत्रात म्हटलं आहे.

