दिलीप कुमार यांना पाहण्यासाठी मी सायकलवरुन जेजुरीला गेलो होतो! - Memories shared by Sharad Pawar about Dilip Kumar | Politics Marathi News - Sarkarnama

दिलीप कुमार यांना पाहण्यासाठी मी सायकलवरुन जेजुरीला गेलो होतो!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 जुलै 2021

शरद पवार यांनी दिलीप कुमार यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी दु:ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टि्वट करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलीप कुमार यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. एक दिग्गज अभिनेता हरपला, असे पवार म्हणाले. Memories shared by Sharad Pawar about Dilip Kumar

शरद पवार म्हणाले की, दिलीप कुमार यांनी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्यांच्या अनेक आठवणीं आजही  माझ्या नजरेसमोर आहे. दिलीप कुमार यांच्या ''नया दैार'' या चित्रपटाचे शुटिंग जेजुरी परिसरात सुरू होते. तेव्हा आम्ही शालेय विद्यार्थी त्यांना पाहण्यासाठी जेजुरीला सायकलवरून गेलो होतो. तेव्हा मला दिलीप कुमार यांना पाहण्याची पहिल्यांदा संधी मिळाली होती. नंतर विधी मंडळ, राज्यसरकारमध्ये काम करीत असताना त्यांच्यात आणि माझ्यात एक वेगळं नातं निर्माण झालं. माझ्यासाठी सभा घेण्यासाठी ते येत असत. त्यांची लोकप्रियता भारताबाहेर आहे. दुर्दैवाने ते आपल्यातून निघून गेले. त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल अशी प्रार्थना मी करतो. 

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन  
मुंबई :  ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (वय ९८)  यांचे आज मुंबईत सकाळी साडेसात वाजता हिंदुंजा रूग्णालयात निधन झाले. ता. २९ जून रोजी प्रकृती खालावल्यामुळे त्यांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठा दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. आज सकाळी साडेसात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो या त्यांच्या पत्नी होत. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख