मेहूल चोकसी याच्या प्रत्यार्पणास भारताच्या प्रयत्नाला धक्का..आज सुनावणी..

मेहुल चोकसी याच्या वकिलांनी प्रत्यार्पणाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
1Sarkarnama_20Banner_20_202021_05_27T125429.605.jpg
1Sarkarnama_20Banner_20_202021_05_27T125429.605.jpg

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅक गैरव्यवहारातील आरोपी व  हिऱ्यांचा व्यापारी मेहुल चोकसी  mehul choksi याच्या प्रत्यार्पणास भारताच्या  प्रयत्नास धक्का बसला आहे. कारण डॅामिनिका न्यायालयाने त्यांच्या प्रत्यार्पणास नकार दिला आहे. मेहुल चोकसी याच्या वकिलांनी प्रत्यार्पणाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. mehul choksi immediate repatriation stayed by dominica court

मेहूल चोकसीचे वकील वेन मार्श यांनी सांगितले की मेहूल यांनी कुठलाही कायदा मोडलेला नाही. त्यामुळे त्यांना न्याय मिळाला पाहिजे. मेहूल चोकसी यांना मारहाण करण्यात आली आहे. त्यांच्या डोळ्यांना सूज आली असून शरिरावर अनेक ठिकाणी जळल्याचे डाग दिसत आहेत. तर दुसरे वकील विजय अग्रवाल म्हणाले की मेहूल यांना जॅाली हार्बर येथील काही जणांनी अपहरण केले होते. त्यांची कार मिळाली आहे. त्यांना डॅामिनिका येथे नेण्यात आले आहे. 

पंजाब नॅशनल बॅक गैरव्यवहारातील आरोपी व  हिऱ्यांचा व्यापारी मेहुल चोकसी  याला काल डॅामिनिका देशात अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेबाबत इंटरपोलने सीबीआयला कळविलं आहे.  "मेहुल चोकसीला आमच्याकडे पाठवू नका, त्याला थेट भारतात पाठवा," असे एंटीगुआ आणि बारबुडाचे पंतप्रधान गॅस्टॅान ब्राऊन यांनी काल डॅामिनिकाच्या प्रशासनाला सांगितले आहे. 

गॅस्टॅान ब्राऊन म्हणाले, "मेहुलला ४८ तासात भारतात पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी भारताने प्रायव्हेट जेट पाठविण्याची व्यवस्था करावी, त्यांच्या प्रत्यार्पणासाठी भारताला कुठलीही अडचण येणार नाही." एँटिगुआ येथून अचानक गायब झालेला फरार भारतीय उद्योजक मेहुल चोकसी शेजारच्या डॅमिनिकामध्ये सापडला आहे.  त्याला डॅमिनिकच्या गुन्हे अन्वेषण विभागाने पकडले. मेहुल चोकसी हा पीएनबी घोटाळ्यातील आरोपी आहे, त्याविरुद्ध इंटरपोलनेही रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे.

डॅामिनिकामध्ये बेकायदा प्रवेश करणाऱ्या मेहुल चोकसीवर कारवाई करुन त्याला आमच्याकडे न पाठवा थेट भारताकडे सोपवा, असे ब्राऊन यांनी डॅामिनिका प्रशासनाला सांगितले आहे. सध्या मेहुल हा डॅामिनिका पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांनी सांगितले की चोकसीला दक्षिण डॅामिनिका येथून पकडण्यात आले. या ठिकाणी एकही विमानतळ नाही, चोकशी हा या ठिकाणी बोटीतून आला असावा. त्याला कैनफील्ड येथील किनाऱ्यावर पकडण्यात आले.  ज्यावेळी मेहुल चोकसीला पकडण्यात आले तेव्हा तो समुद्रात महत्वाची कागदपत्रे नष्ट करीत होता. हे डॅामिनिका पोलिसांनी पाहिले असता, त्यांना संशय आला. पोलिसांनी यांनी त्याला याबाबत विचारले असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. मेहुल चोकसी या बोटीतून डॅामिनिका येथे आला होता. तेथून तो क्यूबा येथे पळून जाण्याच्या बेतात होता, असे चैाकशीत आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com