PNB गैरव्यवहारातील आरोपी मेहुल चोकसी बेपत्ता..

हिऱ्यांचा व्यापारी मेहुल चोकसी हा एंटीगुआ येथून बेपत्ता झाला आहे.
download (3).jpg
download (3).jpg

नवी दिल्ली  : पंजाब नॅशनल बॅक गैरव्यवहारातील आरोपी व  हिऱ्यांचा व्यापारी मेहुल चोकसी हा एंटीगुआ येथून बेपत्ता झाला आहे. चोकसीचे वकील विजय अग्रवाल यांनी ही माहिती दिली.  'एनआयआय' ची अग्रवाल बोलत होते.mehul choksi has gone missing from antigua 

विजय अग्रवाल म्हणाले की मेहुल चोकशी बेपत्ता झाल्याने त्यांचा परिवार चिंतेत आहे. मला याबाबत चर्चा करण्यासाठी बोलविण्यात आले आहे. एंटीगुआचे पोलिस मेहुल चोकसी यांचा शोध घेत आहेत. त्यांच्या सुरक्षिततेबाबत त्यांचे कुंटुबिय चिंतेत असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. 

एंटीगुआ च्या प्रसारमाध्यमानुसार,  antiguanewsroom.com पोलिसांनी मेहुल चोकशी यांचा तपास सुरु केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार चोकशी हा आयलॅंडच्या दक्षिण परिसरात एका हॅाटेलमध्ये जेवण करण्यासाठी रात्री उशीरा गेला होता. तेव्हापासून तो बेपत्ता आहे. त्याच्या गाडीचा शोध सुरु आहे. मेहुल चोकसीच्या बेपत्ता घटनेबाबत अद्याप पोलिसांनी कुठलीही माहिती दिलेली नाही. 

कोण आहे मेहुल चोकशी

61 वर्षीय मेहुल चोकसी हा हिऱ्यांचा व्यापारी आहे. पंजाब नॅशनल बॅक गैरव्यवहारातील आरोपी आहे. याच प्रकरणातील आरोपी नीरव मोदी याचा तो मामा आहे. या दोघांनी मिळून बॅक अधिकाऱ्यांशी संगनमत करुन बॅकेची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली आहे. १४ हजार कोटीं रुपयांचा हा गैरव्यवहार आहे. चोकशी हा भारतातून पळून गेला आहे. सध्या नीरव मोदी हा ब्रिटनच्या कारागृहात आहे.
 
हेही वाचा : आमच्यात सर्व आलबेल..मागच्या सरकासारखी नळावरील भांडणे नाहीत.पटोलेंचे स्पष्टीकरण.. 
मुंबई :  राज्यात कॅाग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कॅाग्रेसने एकत्र येऊन सरकार स्थापन केलं आहे.  काँग्रेसचे सरकारमधील स्थान यावरुन विरोधक अनेकदा महाविकास आघाडीवर निशाणा साधत असतात.  काल कॅाग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी महाविकास आघाडी सरकारमधील कॅाग्रेसचे स्थान यावर आपले मत मांडले होते. मात्र, सरकारमधील समन्वय कुठेही बिघडलं नसल्याचं पटोले यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com