'राजगृह'वरील हल्ल्याची 'मातोश्री'वर चर्चा! - meeting between udhhav thackrey and prakash ambedkar starts at matoshree | Politics Marathi News - Sarkarnama

'राजगृह'वरील हल्ल्याची 'मातोश्री'वर चर्चा!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 10 जुलै 2020

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून प्रकाश आंबेडकर तिसऱ्यांदा 'मातोश्री'वर गेले आहेत.

मुंबई : मुंबईमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवास्थानी झालेल्या तोडफोडीच्या पार्श्वभुमीवर त्यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानी दाखल झाले आहेत. तिथे त्यांची याप्रकरणी चर्चा सुरू आहे.

मंगळवारी सायंकाळी दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'राजगृह' निवासस्थानावर दगडफेक करून झाडांच्या कुंड्यांची तोडफोड करण्यात आली. ही तोडफोड करणाऱ्या व्यक्ती तोंड बांधून आल्या होत्या. त्यातील एक व्यक्ती सिसिटिव्हीमध्ये दिसत आहे. काल ही घटना समजल्यानंतर राज्यभरातून निषेध सुरू झाला. आंबेडकरी अऩुयायी मोठ्या संख्येने राजगृहकडे जावू लागले. त्यामुळे मुंबई पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात बॅरिकेडिंग केले होते. काल प्रकाश आंबेडकर यांनी राजगृहला भेट देवून उपस्थितांना मार्गदर्शन केले होते. 'पोलिस तपास सुरू आहे. तोडफोड करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागची संघटना शोधली गेली पाहिजे. काही जण या प्रकरणाला वेगळे वळण द्यायचा प्रयत्न करत आहेत पण त्याकडे दुर्लक्ष करा. आपला फोकस हलू देवू नका', असे आंबेडकर म्हणाले होते.

त्यानंरच आज प्रकाश आंबेडकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी 'मातोश्री' निवासस्थानी दाखल झाले आहेत. प्रत्यक्ष हल्लेखोरापेक्षा त्याच्या पाठीमागे असणाऱ्या संघटनेवर कारवाईची त्यांची मागणी आहे. त्यांच्या चर्चेनंतर 'राजगृह'ला कायमस्वरूपी सुरक्षा मिळू शकते.
 
माजी मंत्री तावडेंची मंत्री सामंतांवर टीका

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने परिक्षा न घेण्याचा घेतलेला निर्णय हा आदित्य ठाकरेंच्या बालहट्टामुळे नसून कुलगुरुंच्या आग्रहाखातर आहे असं दाखविण्याचा फार्स आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद करुन केल, अशी टीका भाजप नेते, माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. 

सामंत यांच्या पत्रकार परिषदेनंतर परिक्षा होणार का नाही? एटीकेटी विद्यार्थ्यांचे काय होणार? याबाबत कोणतीच स्पष्टता विद्यार्थ्यांना आली नाही. उलट मंत्र्यांनी अजूनच गोंधळात भर टाकली.  'परिक्षा घेता येणार नाही' अशी कुलगुरूंची कथित वक्तव्यं निवडून पत्रकार परिषदेत दाखवायचे काम उदय सामंत यांनी आज केले. नेत्याला खुश करण्याच्या नादात राज्यातल्या विद्यार्थाच्या भवितव्याशी आपण खेळतोय, त्याच्या रोजगाराशी खेळतोय, त्यांच्या उच्च शिक्षण घेण्याच्या स्वप्नाशी आपण खेळतो आहोत हे मंत्री महोदयांनी लक्षात ठेवावे.असेही तावडे यांनी म्हटले आहे. 

edited by swarup jankar 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख