मोठी बातमी : वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता जूनमध्ये.. - Medical students exams will now be held in June | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मोठी बातमी : वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता जूनमध्ये..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 15 एप्रिल 2021

येत्या 19 एप्रिल पासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अमित देशमुख यांनी दिली.

लातूर : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत  येत्या 19 एप्रिल पासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.  या परीक्षा आता येत्या जून मध्ये घेण्यात येणार आहेत. परिक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल.

या परीक्षा पुढे ढकलणे  बाबत आपली  उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे, आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही चर्चा झाली आहे, अशी माहितीही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. 

 

सुप्रिया सुळेंनी मानले आभार

''कोविड19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता वैद्यकीय शाखेच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याबद्दल वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे मनापासून आभार. वैद्यकीय शाखेचे अनेक विद्यार्थी व पालक यांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले होते. सुमारे ५० हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार होते. ही एकंदर परिस्थिती लक्षात घेत व विद्यार्थी व इतर घटकांशी संवाद साधून सरकारने हा सर्वसमावेशक निर्णय घेतला, याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा आभार,'' असे राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाले. याबाबतची सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. 

राज्य सरकारने दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.  आता दहावीची परीक्षा जूनमध्ये, तर बारावीची परीक्षा मे महिन्यात घेण्यात येणार आहे. दहावीची परीक्षा सर्वसाधारणपणे जूनमध्ये होईल. तर बारावीची परीक्षा मे महिन्याच्या शेवटी होईल.’’ नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होणाऱ्या दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे दहावीची परीक्षा सर्वसाधारणपणे जूनमध्ये, तर बारावीची परीक्षा मे महिन्यात होईल. शिक्षण मंडळामार्फत परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होत असते. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयानुसार दहावी-बारावीच्या मे-जून २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख