आपण समाज म्हणून इथपर्यंत कसे आलो? बलात्कार पीडितेच्या 'त्या' व्हिडिओवर मातोंडकर संतापल्या

मध्य प्रदेशात एका अल्पवयीन बलात्कारपीडितेची चक्क आरोपीसोबत धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
  Urmila Matondkar .jpg
Urmila Matondkar .jpg

भोपाळ : मध्य प्रदेशात एका अल्पवयीन बलात्कारपीडितेची चक्क आरोपीसोबत धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित मुलीला मारहाण करुन आरोपीसोबत दोरीने बांधून जमावाने त्या दोघांची धिंड काढली. हा जमाव 'भारत माता की जय'च्या घोषणा देत होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, असून त्यावर शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी संताप व्यक्त केला.

मोतोंडकर यांनी ट्वीटकरत म्हटले आहे की ''या घटनेबाबत बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीयेत. मध्य प्रदेशमध्ये १६ वर्षांच्या बलात्कार पीडितेला तिच्यावर बलात्कार करणाऱ्यासोबतच दोरीने बांधून मिरवणूक काढण्यात आली. हा सर्व अत्याचार सुरु असताना 'भारत माता की जय'च्या घोषणा दिल्या जात होत्या? आपण समाज म्हणून इथपर्यंत कसे आलो? हे कृत्य अमानवीय आहे'', अशा शब्दात उर्मिला यांनी आपला राग व्यक्त केला आहे.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. भोपाळपासून चारशे किलोमीटर अंतरावर असलेल्या अलिराजपूर जिल्ह्यातील एका गावात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर जनतेत संतापाची भावनाही निर्माण झाली आहे. विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरले आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या कुटुंबीयांनीच तिला आरोपीसोबत चालण्यास भाग पाडले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेला पीडितेचे नातेवाईक तेवढेच जबाबदार असल्याने त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

या बलात्कार प्रकरणातील आरोपी 17 वर्षांचा असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस त्याच्या वयाची तपासणी करणार आहेत. असे असले तरी त्याचे आधी लग्न झाले असून, त्याला दोन अपत्येही आहेत. त्यामुळे अल्पवयीन असल्याच्या दाव्यावर शंका व्यक्त होत आहे. 

अटक केलेले पाचही आरोपी पीडित मुलीचे नातेवाईक आहेत. यात मुलीचे भाऊ आणि चुलत्यांचा समावेश आहे. पीडित मुलगी आणि आरोपी हे गुजरातमध्ये मजूर म्हणून काम करण्यासाठी गेले होते. ते काही दिवसांपूर्वी मूळ गावी परतले. त्यावेळी आरोपीने बलात्कार केल्याची माहिती पीडित मुलीने कुटुंबीयांना दिली होती. यानंतर त्यांनी पीडित मुलगी व आरोपीला रात्रभर मारहाण केली. सकाळी दोघांनाही दोरीने एकत्र बांधून त्यांची धिंड काढली, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

Edited By - Amol Jaybhaye 

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com