#Maratha Reservation : एकत्र लढलो तर न्याय नक्कीच.... - Maratha Reservation If we fight together, justice will surely come Ashok Chavan | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : लॉकडाऊनच्या विरोधात साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पोवईनाका येथे पोत्यावर बसून भिक मांगो आंदोलन केले.

#Maratha Reservation : एकत्र लढलो तर न्याय नक्कीच....

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 मार्च 2021

" सर्वांनी एकत्रित काम केलं तर मराठा आरक्षण संदर्भात न्याय मिळेल," असे अशोक चव्हाण यांनी आज  सांगितले.  

मुंबई : "मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारने बाजू मांडली पाहिजे, केंद्रीय कायदेमंत्री आमच्या बैठकीत उपस्थित राहू शकले नाहीत. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आरक्षण संदर्भात मदत करू असं आश्वासन दिल आहे.सर्वांनी एकत्रित काम केलं तर मराठा आरक्षण संदर्भात न्याय मिळेल," असे काँग्रेसचे नेते व मराठा आरक्षण समितीचे उपाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.  

अशोक चव्हाण म्हणाले की, केंद्रीय कायदेमंत्र्यांना त्यांच्या वेळेनुसार मी बैठक घेतली तरी ते येऊ शकले नाहीत. विरोधी पक्षाने केंद्र सरकारकडे बाजू मांडावी, केंद्रात त्याचं सरकार आहे. समाजाला वेठीस धरणे हि आमची भूमिका अजिबात नाही. न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठवावी, यासाठी आम्ही प्रयत्न केले, पण त्यांनी स्थगिती काढण्यास नकार दिला. आम्ही ४ ते ५ वेळा न्यायालयासमोर बाजू मांडली, पण काहीही झाले नाही. यामुळे अनेकांचे प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने स्टे काढावा, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. सर्व एकत्रित लढलो तर न्याय नक्कीच मिळेल..

मराठा आरक्षण टिकवण्यासाठी केंद्र सरकारकडून अपेक्षित असलेल्या सहकार्यावर विचारविनिमय झाला आहे. राज्याची भूमिका पुन्हा एकदा केंद्राला कळविण्याचे निश्चित करण्यात आले. याशिवाय मराठा समाजाच्या इतरही प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली.

देशातील अनेक राज्यांमधून त्यांच्या आरक्षणाचे प्रकरण मराठा आरक्षणाच्या प्रकरणाशी जोडावे, अशी मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या आहेत. मराठा आरक्षणाचे प्रकरण ईडब्ल्यूएस तसेच इतर राज्यांच्या आरक्षण प्रकरणाशी जोडावे, ही राज्य सरकारची देखील भूमिका असून, तशी विनंती सर्वोच्च न्यायालयात यापूर्वीच करण्यात आली आहे. मराठा आरक्षण प्रकरणामध्ये इंद्रा साहनी निवाड्याचा संदर्भ असल्याने ही सुनावणी नऊ किंवा अकरा न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे व्हावी, अशी राज्य सरकारची अपेक्षा आहे. 

हेही वाचा : राहुल गांधीप्रमाणेच भाजपही आपली चूक मान्य करेल का..  

मुंबई : कॉर्नेल विद्यापीठात एका कार्यक्रमात काँग्रेसचे नेते राहुल गांधी सहभागी झाले होते. त्यावेळी राहुल यांनी आणीबाणीबाबत मोठं वक्तव्य केलं. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लावलेली आणीबाणी ही चूकच होती, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.  याच विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला गुजरात दंगलीची आठवण करून दिली आहे. गांधी यांच्या या विधानावरून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक व्यक्तव्य केलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आज नवाब मलिक यांनी पत्रकार कक्षात प्रसारमाध्यमांची प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले,"45 वर्षानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आणीबाबणीबाबत चुकीचा निर्णय असल्याचं मान्य केलं आहे. दिल्लीत झालेल्या दंगलबाबत माफी मागितली आहे. गुजरात दंगलबाबत भाजपची चूक असल्याचं त्यांनी मान्य केलं तर बरं होईल. आता भाजपनेही आपली चूक मान्य केली पाहिजे."  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख