Maratha Kranti Morcha demands resignation of Energy Minister Nitin Raut .jpg
Maratha Kranti Morcha demands resignation of Energy Minister Nitin Raut .jpg

नितीन राऊतांच्या राजीनाम्यासाठी मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

पदोन्नतीमधील आरक्षण उच्च न्यायालयाने रद्दबादल केल्यावर राज्य सरकारनेही नुकताच तसा जीआर काढला होता.

मुंबई : सरकारी पदांवरील पदोन्नतीमधील आरक्षणाला (Reservation in Promotion) पाठिंबा देऊन उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी समानतेच्या शपथेचा भंग केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला, असून मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी राऊत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. (Maratha Kranti Morcha demands resignation of Energy Minister Nitin Raut)

पदोन्नतीमधील आरक्षण उच्च न्यायालयाने रद्दबादल केल्यावर राज्य सरकारनेही नुकताच तसा जीआर काढला होता. त्यावरून मोठा गोंधळ उडाला असून उलटसुलट चर्चा सुरु आहे. या विषयावर राऊत यांनी पक्षपाती भूमिका घेतल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला असून त्यांनी राऊत यांचा तीव्र निषेध केला आहे. या विषयावर ओबीसी, मराठा व खुल्या प्रवर्गातील इतर लोक लक्ष ठेऊन असून आम्ही कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असेही मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

न्यायालयाने सरकारी खात्यांमधील पदोन्नतीचे आरक्षण रद्दबादल केल्यावर शासनाने त्याआधारे तसा जीआर 18 फेब्रुवारी व 8 मे रोजी काढला आहे.  पदोन्नतीमधील आरक्षणला स्थगिती मिळालेली असताना काही राजकीय व सामाजिक संघटना आंदोलनाचे इशारे देत आहेतच. पण खुद्द शासनातील काही मंत्री या स्थगितीबाबत असंवैधानिक वक्तव्य करीत आहेत, असा दावा मोर्चातर्फे करण्यात आला आहे. त्याचबरोबर हे मंत्री सध्याच्या साथरोगाच्या काळात आंदोलनाचे इशारे देऊन समाजाला व शासकीय यंत्रणेला वेठीस धरण्याचे काम करीत आहेत. सामाजिक सलोखा बिघडवण्याचे कामदेखील ही मंडळी करीत आहेत, असा आरोप मोर्चातर्फे करण्यात आला आहे.

उर्जामंत्री नितीन राऊत यांनीही या प्रश्नाबाबत पक्षपाती भूमिका घेतली आहे. मंत्रीपद स्वीकारताना त्यांनी सर्व समाजघटकांनी समान न्याय देण्याची भूमिका मान्य केली होती व तशी शपथही घेतली होती. मात्र आता पदोन्नतीमधील आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेऊन ते या शपथेचा भंग करीत आहे. असे करून ते न्यायालयाच्या आदेशाला तसेच सरकारी निर्णयालाही विरोध करीत आहेत. त्यामुळे मोर्चातर्फे राऊत यांच्या राजीनाम्याची मागणी राज्यपाल तसेच मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात येईल, असे मोर्चाचे समन्वयक विरेंद्र पवार यांनी कळविले आहे. 

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com